Mumbai News : वरळीत इमारतीच्या 42 व्या मजल्यावरून मोठा दगड कोसळून अपघात, दोन जणांचा मृत्यू
Mumbai News : बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीच्या (Building) 42 व्या मजल्यावरून बांधकामासाठी वापरला जाणारा मोठा दगड खाली पडून अपघात घडला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
![Mumbai News : वरळीत इमारतीच्या 42 व्या मजल्यावरून मोठा दगड कोसळून अपघात, दोन जणांचा मृत्यू Maharashtra Mumbai Two people died after a big stone that was being used for construction in Worli Mumbai News : वरळीत इमारतीच्या 42 व्या मजल्यावरून मोठा दगड कोसळून अपघात, दोन जणांचा मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/15/d2c82685ddbae3bf1660ef9a612a542e1676434545833339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mumbai Worli News : बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या (Building) 42 व्या मजल्यावरून बांधकामासाठी वापरला जाणारा मोठा दगड खाली पडून अपघात घडला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती मुंबई महानगर पालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation) वतीनं देण्यात आली आहे. ही घटना मुंबईतील वरळी (Worli News) परिसरात घडली आहे. तसेच या परिसरातील अनेक वाहनांवर देखील दगड पडल्याची घटना देखील घडली आहे. साबीर अली (वय 36) आणि इम्रान अली खान (वय 30) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
अपघातत मृत्यू झालेले दोघेही रस्त्यावरून जात होते. त्यावेळी अचानक इमारतीच्या 42 व्या मजल्यावरुन दगड खाली कोसळला. यात ते दोघेही जखमी झाले होते. दुर्घटनेनंतर बसाच वेळ हे दोघेही गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडून होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
वरळी परिसरातच 9 जानेवारीलाही झाला होता अपघात
बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरुन दगड पडून दोघांचा मृत्यू झाला आहे. दगडाखाली बदल्यानं मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, 9 जानेवारी रोजी मुंबईतील वरळी परिसरात लिफ्टला अपघात झाल्याची घटना समोर आली होती. ही घटना वरळीच्या अवघना टॉवर परिसरात घडली होती. या ठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या लिफ्टचा अपघात झाला होता. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या परिसरात आता अपघाताची दुसरी घटना घडली आहे.
Maharashtra | Two people died after a big stone that was being used for construction fell down from the 42nd floor of an under-construction building in Worli area of Mumbai: BMC pic.twitter.com/ToQrZVxi6y
— ANI (@ANI) February 14, 2023
बंगळुरुमध्येही अशीच घटना घडली होती
याआधी जानेवारी महिन्यात कर्नाटकातील बंगळुरु इथेही अशाच प्रकारची घटना घडल्याची बातमी आली होती. 10 जानेवारीला कर्नाटकातील बंगळुरूमध्ये मेट्रोसाठी बांधकाम सुरू असताना खांब कोसळून एका महिलेसह तिच्या अडीच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. ही महिला आपल्या पतीसोबत दुचाकीवरून जात होती, त्याच दरम्यान हा अपघात झाला होता. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहेत. ही घटना बेंगळुरूच्या नागावरा भागात घडली होती. अनेक दिवसापासून हा खांब पडण्याच्या अवस्थेत होता. त्यानंतरही जबाबदार लोकांनी याकडे लक्ष दिले नाही. अखेर या खांबाखाली येऊन एक महिलेचा आणि तिच्या मुलाचा मृत्यू झाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Bhiwandi Building Collapse : भिवंडीत दोन मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली दबून एकाचा मृत्यू, एक गंभीर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)