(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Corona Update : मुंबईत नव्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत दुप्पट नागरिक कोरोनामुक्त, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्क्यांवर
Mumbai Corona Update : मुंबईत रविवारी समोर आलेल्या रुग्णसंख्ये नवे 1,160 कोरोनाबाधित आढळले असून 2,530 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
Mumbai Coronavirus Cases : मुंबईमधील नव्याने आढळणाऱ्या कोरोना (Corona)रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या बरीच अधिक असल्याच मागील काही दिवस सातत्याने दिसत आहे. आजदेखील (रविवारी) नव्याने आढळलेले मुंबईतील कोरोनाबाधित 1 हजार 160 असून 2 हजार 530 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ज्यामुळे मुंबईत सद्यस्थितीला 10 हजार 797 सक्रिय कोरोनारुग्ण आहेत.
महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत रविवारी सायंकाळी 6 पर्यंत समोर 1 हजार 160 नवे रुग्ण आढळले असून 10 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 612 झाली आहे. तर मागील 24 तासांत 2 हजार 530 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका आहे.
मुंबईतील कोरोनारुग्ण संख्येच्या आकडेवारीवर एक नजर..
दिनांक | मुंबईतील रुग्णसंख्या |
15 जानेवारी | 10, 661 |
16 जानेवारी | 7, 895 |
17 जानेवारी | 5, 956 |
18 जानेवारी | 6, 149 |
19 जानेवारी | 6, 032 |
20 जानेवारी | 5,708 |
21 जानेवारी | 5,008 |
22 जानेवारी | 3,568 |
23 जानेवारी | 2,250 |
24 जानेवारी | 1,857 |
25 जानेवारी | 1,815 |
26 जानेवारी | 1,858 |
27 जानेवारी | 1,384 |
28 जानेवारी | 1,312 |
29 जानेवारी | 1,411 |
30 जानेवारी | 1,160 |
सध्या मुंबईतील 8 इमारती सील करण्यात आल्या आहेत. तसंच आज नव्याने सापडलेल्या 1 हजार 160 रुग्णांपैकी 160 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 37 हजार 573 बेड्सपैकी केवळ 2 हजार 268 बेड वापरात आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Omicron in Kids : काळजी घ्या! चिमुकल्यांना ओमायक्रॉनचा अधिक धोका, लागण झालेल्या मुलांमध्ये 'ही' पाच लक्षणे
- India Corona Vaccination : लसीकरणाचा आणखी एक महत्वाचा टप्पा पार, 75 टक्के प्रौढ व्यक्तींचे लसीकरण पूर्ण
- भामहाराष्ट्रात मास्कमुक्ती शक्य आहे की नाही?, टास्क फोर्सने एका वाक्यात सांगितलं!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha