(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Corona Update : मुंबईतील रुग्णसंख्या स्थिरावली, आजही नवे 6 हजार 32 कोरोनाबाधित
Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या मागील काही दिवसांपासून कमी होत असल्याने रुग्णवाढ स्थिरावली असल्याचं दिसून येत आहे. बुधवारी 6 हजार 32 नवे कोरोना बाधित आढळले आहेत.
Mumbai Coronavirus Cases : मागील काही दिवसांत मुंबईतील कोरोना (Corona) रुग्णांची संख्या कमी होत असल्याने आता मुंबईतील रुग्णसंख्या स्थिरावल्याचं दिसून येत आहे. यामुळे मुंबईकरांसह पालिका प्रशासनाची डोकेदुखी काहीशी कमी झाली आहे. मुंबईत आज (बुधवारी) 6 हजार 32 नवे कोरोना बाधित आढळले आहेत. मंगळवारच्या तुलनेत रुग्णसंख्या जवळपास 100 ने कमी झाली असून मुंबईतील रुग्णसंख्या स्थिरावली असली तरी नियमांचे पालन करणं मात्र महत्त्वाचं असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत बुधवारी 6 हजार 32 नवे रुग्ण आढळले असून 12 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 488 झाली आहे. तर नव्या बाधितांच्या तुलनेत जवळपास तिप्पट रुग्ण म्हणजेच 18 हजार 241 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट वाढून 95 टक्के इतका आहे.
मुंबईतील कोरोनारुग्ण संख्येच्या आकडेवारीवर एक नजर..
दिनांक | मुंबईतील रुग्णसंख्या |
1 जानेवारी | 6347 |
2 जानेवारी | 8063 |
3 जानेवारी | 8082 |
4 जानेवारी | 10860 |
5 जानेवारी | 15166 |
6 जानेवारी | 20181 |
7 जानेवारी | 20971 |
8 जानेवारी | 20,318 |
9 जानेवारी | 19474 |
10 जानेवारी | 13,648 |
11 जानेवारी | 11,647 |
12 जानेवारी | 16,420 |
13 जानेवारी | 13, 702 |
14 जानेवारी | 11, 317 |
15 जानेवारी | 10, 661 |
16 जानेवारी | 7, 895 |
17 जानेवारी | 5, 956 |
18 जानेवारी | 6, 149 |
19 जानेवारी | 6, 032 |
सध्या मुंबईतील 54 इमारती सील करण्यात आल्या आहेत. तसंच आज नव्याने सापडलेल्या 6 हजार 32 रुग्णांपैकी 538 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने 38 हजार 109 बेड्सपैकी केवळ 5 हजार 58 बेड वापरात आहेत.
इतर बातम्या :
-
ओमायक्रॉन डेल्टा व्हेरियंटविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवेल, पण यासाठी 'ही' गोष्ट करणं महत्त्वाचं- WHO
- School Reopen : राज्यातील शाळा लवकरच सुरू होणार, आदित्य ठाकरेंचे संकेत
- Pune : अपहरण झालेला पुण्यातील चार वर्षाचा स्वर्णव सापडला; अपहरणाचं कारण अद्याप गुलदस्त्यात
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha