(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune : अपहरण झालेला पुण्यातील चार वर्षाचा स्वर्णव सापडला; अपहरणाचं कारण अद्याप गुलदस्त्यात
आठ दिवसांपूर्वी पुण्यातील स्वर्णव चव्हाण या चार वर्षाच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं. पोलिसांना या मुलाचा शोध घेण्यात यश आलं आहे.
पुणे : पुण्यातील डॉ. सतीश चव्हाण यांचा अपहरण झालेला चिमुरडा सापडला. स्वर्णव चव्हाण (डुग्गु),वय 4, असं या मुलाचं नाव आहे. या मुलाचं बालेवाडीमधून झाले अपहरण होते. पुणे पोलिसांची मोठी फौज मुलांला शोधत होती. खूप गुप्तता पाळून हा तपास सुरू होता. जवळपास तीनशे ते साडेतीनशेच्या वर पोलीस कर्मचारी आणि अधिकारी या मुलांचा शोध घेत होते.
अखेर आज वाकड जवळील पुनावळे येथे पोलिसांना त्याला शोधण्यात यश आलंय. चतु:श्रुगी पोलिसात याबाबत तक्रार नोंद करण्यात आली होती. या मुलाचं कशासाठी अपहरण केलं किंवा का केलं याचं कारण पोलीस शोधत आहेत. गेले आठ दिवसांपासून पोलीस सोशल मीडियावर अनेक ठिकाणी फोटो पाठवून तपास सुरू होता. अखेर या मुलाला आठ दिवसांनंतर शोधण्यात यश आलं आहे.
या मुलाचं कोणी अपहरण केलं हे मात्र अजून कळू शकते नाही. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
स्वर्णव सुखरुप सापडला; अभिनंदन @PuneCityPolice !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 19, 2022
बालेवाडी परिसरातील अपहरण झालेला ४ वर्षीय स्वर्णव चव्हाण आज सापडला. पालकांच्या कुशीत असलेला स्वर्णवला पाहण्यासारखं दुसरं सुख ते काय?@CPPuneCity
यांच्यासह स्वर्णवला शोधण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद ! pic.twitter.com/MT9vV00fHt
स्वर्णव चव्हाण या चिमुरड्याला अपहरणकर्ता पिंपरी चिंचवडच्या पुनावळ्यात सोडून गेला. लोटस बिजनेस स्कूल शेजारी असणाऱ्या इमारतीचे सुरक्षा रक्षक दादाराव जाधव यांच्याकडे देऊन तो पसार झाला. मग त्याच इमारतीत लिफ्टचे काम करणाऱ्या तानाजी गिरमकरला त्यांनी ही बाब सांगितली. स्वर्णवकडे असणाऱ्या बॅगेत काही पुस्तकं दिसली, त्यावर त्याच्या वडिलांचा नंबर होता. त्यांना संपर्क केला आणि स्वर्णव आई-वडिलांकडे सुखरूप परतला. त्यानंतर बाणेरच्या ज्युपीटर हॉस्पिटलमधे स्वर्णवची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या :
- पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात गुन्हेगारांचा राडा, हातात धारधार हत्यारे घेऊन घातला नंगानाच
- PMPML : पुण्यात पीएमपीएल प्रवासासाठी युनिव्हर्सल पासची सक्ती, आजपासून होणार अंमलबजावणी
- केंद्राकडून शरद पवारांना पद्म पुरस्कार, मात्र देवेंद्र फडणवीसांना त्याचा विसर; सुप्रिया सुळे यांची टीका
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha