'शिवसेनेबरोबर स्थानिक पातळीवर जमवून घ्या', अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सूचना
शिवसेनेसोबत कायम राहायचं आहे, त्यामुळे स्थानिक पातळीवर जमवून घ्या, अशा सूचना अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
मुंबई : महाविकास आघाडीतील काही नेते ग्रामपंचायत निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे सांगत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र आपल्या कार्यकर्त्यांना वेगळ्या सूचना दिल्या आहेत. आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचे आहे, त्यामुळे शिवसेनेबरोबर स्थानिक पातळीवर जमवून घ्या, असे आदेश राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.
“आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचे आहे. महाविकास आघाडी झाल्यानंतर स्थनिक पातळीवर खटके उडत आहे, पण आपल्याला सेनेबरोबर जुळवून घ्यायचे आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबर स्थानिक पातळीवर जमवून घ्या” अशा सूचना अजित पवारांनी आजच्या बैठकीत कार्यकर्त्यांना दिल्या. लवकरच महामंडळ वाटप करणार असल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली.
Live Updates | 'शिवसेनेबरोबर स्थानिक पातळीवर जमवून घ्या' अजित पवारांचे कार्यकर्त्यांना निर्देश. आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचे आहे. आजच्या बैठकीत अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना.#NCP #ShivSena @vaibhavparab21https://t.co/on9IOAdCWW pic.twitter.com/mQdCSlfgoA
— ABP माझा (@abpmajhatv) December 23, 2020
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील महत्वाच्या नेत्यांची बैठक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या सर्वच उमेदवारांना खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार कानमंत्र देणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच ही बैठक बोलवण्यात आली आहे. मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटर येथे ही बैठक होत आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, राजेश टोपे अशा बड्या नेत्यांची आणि काही महत्त्वाच्या मंत्र्यांचीही या बैठकीला उपस्थिती असणार आहे.
शिवसेना, भाजप, काँग्रेस या पक्षांप्रमाणंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आता राष्ट्रवादीनंही मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. पराभूत उमेदवारांना या बैठकीच बोलवत स्थानिकांचे प्रलंबित प्रश्न आणि पराभवाच्या कारणांवर चर्चा करत त्यावर सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शिवाय प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भातही पवार मार्गदर्शन करणात आहेत. आगामी निवडणुकांसाठी पक्षाची तयारी कशी असणं अपेक्षित आहे याबाबतही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
NCP Meeting | राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची वाय.बी चव्हाण सेंटरमध्ये बैठक; काय झालं बैठकीत?