Mumbai Coronavirus : मुंबई महापालिकेकडून मायक्रो कंटेन्मेंट झोन, 1169 इमारती आणि 10, 997मजले सील
मुंबईत एखाद्या सोसायटीत पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास अशी इमारत सील केली जाते. अशा सोसायट्या आता मायक्रो कंटेन्मेंट घोषित करण्यात येणार आहेत.

मुंबई : मुंबईत वाढत्या रुग्णसंख्येनंतर महापालिकेनं मायक्रो कंटेन्मेंट झोन आणि इमारतीतील रुग्ण रहात असलेले मजले सील करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत सध्या 97 कंटेंटमेंट झोन आहेत.1169 सील बिल्डींग/ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत तर 10, 797 मजले सील केलेले आहेत. टी वॉर्ड मुलुंडमध्ये मजले सील करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे...
मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणजे काय?
पाच पेक्षा अधिक रुग्ण आढळणा-या सोसायटी मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणतात.
नियम न पाळल्यास 10 हजार रुपयाचा दंड
एखाद्या सोसायटीत पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास अशी इमारत सील केली जाते. अशा सोसायट्या आता मायक्रो कंटेन्मेंट घोषित करण्यात येणार आहेत. सोसायट्यांनी तसा गेटबाहेर फलक लावणे आवश्यक आहे. या सोसायट्यांनी कोविड नियम पाळणे बंधनकारक असून बाहेरील व्यक्तीस सोसायटीत प्रवेश देऊ नये. संबंधित गृहनिर्माण सोसायटीने या सर्वाचे निरीक्षण करून नियमाच्या अंमलबजावणीसाठी जबादारी घ्यावी असे आदेश पालिकेने दिले आहेत. मात्र सोसायटीने नियमाची अंमलबजावणी न केल्यास सोसायटीला 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. संबंधित सोसायटीने पुन्हा दुर्लक्ष करून नियम मोडल्यास 20 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. पालिकेने तसे आदेश दिले असून त्याबाबत परिपत्रकही जारी केले आहे.
- इमारतीबाहेर पोलिस तैनात करण्यात येतील
- बाहेरील व्यक्तीला सोसायटीत प्रवेश बंदी
- वर्तमान पत्र विक्रेत्यांनी सोसायटीच्या गेटवर वर्तमानपत्र द्यावे
- जीवनावश्यक वस्तू आदी साहित्यही सोसायटीच्या गेटवर स्वीकारावे
- सोसायटीतील व्यक्तीला कोरोना चाचणी करायची असल्यास त्यांनी लॅबच्या व्यक्तीला घरी बोलवावे
- कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण घराबाहेर पडल्यास एफआयआर दाखल होणार
Before You Go
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू























