एक्स्प्लोर
Advertisement
Maha Budget 2021 : अर्थसंकल्पात मुंबईसाठी भरीव घोषणा, अजितदादांनी मुंबईला काय दिलं?
Maharashtra Budget 2021 Highlights : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत असल्यानं अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. हे राज्य सरकारचं बजेट होतं की मुंबई महापालिकेचं? असा प्रश्नही विरोधकांनी उपस्थित केला आहे.
Maharashtra Budget 2021 Highlights : महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारचा दुसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सादर केला. कोरोना काळात राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अशा स्थितीत जनतेला काय दिलासा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशात देखील सरकारकडून विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे तसेच अनेक विभागांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधीची घोषणा देखील केली आहे. यात सर्वात विशेष ठरलं ते अर्थसंकल्पात मुंबईसाठी केलेल्या घोषणा. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत असल्यानं अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. हे राज्य सरकारचं बजेट होतं की मुंबई महापालिकेचं? असा प्रश्नही विरोधकांनी उपस्थित केला आहे.
अर्थसंकल्पात मुंबईसाठी केलेल्या महत्वाच्या घोषणा-
- शिवडी-न्हावाशेवा प्रकल्प 2022 ला पूर्ण करणार.
- वरळी ते शिवडी पूलाचे काम 3 वर्षात पूर्ण केले जाणार.
- मुंबई, ठाणे, नवी मुंबईत जलमार्गाचा वापर वाढवणार.
- मुंबईतल्या नेहरू सेंटरसाठी 10 कोटींची तरतुद
- बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी 400 कोटींची घोषणा
- वरळी, वांद्रे, धारावीसह आणखी चार ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणार
- सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी 19 हजार 500 कोटींची घोषणा
- कोलशेत, काल्हे, डोंबिवली, मीरा भाईंदरला जेट्टी उभाणार.
- मुंबईतल्या पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर सायकलिंग लेन
- मुंबईतल्या नद्यांना पुनरुज्जीवीत करण्यासाठी मोठी घोषणा
- मुंबईतील 14 मेट्रोलाईनसाठी 1 लाख 40 हजार कोटी खर्च अपेक्षित असून, मेट्रो मार्ग 2अ, 7चे काम 2021 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट्य.
- मुंबईत रेल्वे रुळांवरील 7 उड्डाणपूल उभारणार.
- मुंबई-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला कॅबिनेटची मंजुरी
- मुंबईतील पूर्वमुक्त महामार्गाला विलासराव देशमुखांचं नाव देण्याची घोषणा
- वरळीच्या डेअरीच्या जागेवर पर्यटन केंद्र उभारण्याचे काम लवकरच सुरु केलं जाणार.
- मुंबईसाठी महत्त्वाच्या असलेल्या कोस्टल रोडचं काम 2024 पूर्वी पूर्ण करणार.
- Maharashtra Budget 2021 LIVE: अर्थसंकल्पात कोरोना संकटात आरोग्य विभागासाठी मोठी तरतूद
- Maha Budget 2021, Health: आरोग्य सेवांसाठी 7 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद : अजित पवार
- Maha Budget 2021 Agriculture | तीन लाखांपर्यंतच्या कर्जाची वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज शून्य टक्क्याने, अर्थसंकल्पात घोषणा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement