Maharashtra Assembly Session 2021 : 12 नव्हे 106 आमदारांचे निलंबन केले तरी चालेल पण ओबीसी मुद्यावर बोलत राहू : देवेंद्र फडणवीस
Maharashtra Assembly Session :तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की प्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. या निलंबनाच्या कारवाईनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर टीका केली आहे.
मुंबई : विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Session)पहिल्याच दिवशी सभागृहात जोरदार राडा पाहायला मिळाला. अधिवेशनात तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की प्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना (BJP MLA suspended) निलंबित करण्यात आलं आहे. या निलंबनाच्या कारवाईनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सरकारवर टीका केली आहे. ओबीसीच्या मुद्यावर आम्ही सरकारले उघडे पाडले. त्यामुळं खोटे आरोप लावून आमदारांना निलंबित केले. 12 नव्हे 106 आमदारांचे निलंबन केले तरी चालेल पण ओबीसी मुद्यावर बोलत राहू, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. भास्कर जाधव काय बोलले ते सांगणार नाही. सर्व शांत झालेले असताना ही मॅन्यूफॅक्चर्ड कारवाई केलीय, असं फडणवीस म्हणाले.
Maharashtra Assembly Session 2021 : तालिका अध्यक्ष धक्काबुक्की प्रकरणी भाजपचे 12 आमदार निलंबित
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, नेहमीच अध्यक्षांचा चेंबरमध्ये बाचाबाची होते, तरीही आतापर्यंत निलंबन झाले नाही. यावेळी कुणीही शिवी दिली नाही. शिवी देणारे कोण होते हे सर्वांना माहिती आहे, असंही ते म्हणाले. ते म्हणाले की, आशिष शेलारांनी माफी मागूनही कारवाई केली गेली. निलंबनासाठी स्टोरी तयार केली गेली, असा आरोप देखील फडणवीस यांनी केला.
MPSC : 31 जुलैपर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा
त्यांनी म्हटलं की, राज्य सरकारला प्रथम मागासवर्ग आयोग स्थापन करावा लागेल असं जस्टीस भोसले, खंबाटांनी मराठा आरक्षणासंदर्भात सांगितले आहे. त्यामुळे असे ठराव करून उपयोगाचे नाही. सरकार वेळकाढू धोरण काढतंय दोन्ही प्रस्ताव हे दोन्ही समाजाची दिशाभूल करणारे आहेत.
चंद्रकांतदादांच्या पत्राने गडकरींची अडचण? पत्राला पक्षांतर्गत राजकारणाचे कंगोरे असल्याची चर्चा
निलंबन झालेल्या आमदारांची नावे
डॉ. संजय कुटे, जळगाव जामोद
आशिष शेलार, वांद्रे पश्चिम
अभिमन्यू पवार, औसा, लातूर
गिरीश महाजन, जामनेर, जळगाव
अतुल भातखळकर, कांदिवली पूर्व, मुंबई
पराग अळवणी, विलेपार्ले, मुंबई
हरिश पिंपळे, मूर्तिजापूर, अकोला
राम सातपुते, माळशिरस, सोलापूर
जयकुमार रावल, सिंदखेडा, धुळे
योगेश सागर, चारकोप, मुंबई
नारायण कुचे, बदनापूर, जालना
कीर्तिकुमार भांगडिया, चिमूर, चंद्रपूर