एक्स्प्लोर

Mahalaxmi Race Course : महालक्ष्मी रेसकोर्सवरील थीम पार्कचा मार्ग मोकळा

थीम पार्कसाठी 120 एकर तर टर्फ क्लबला 91 एकर जागेचे वाटप होईल. मात्र, ही मुंबईकरांच्या हक्काची जागा असल्याचा दावा माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केला आहे.

मुंबई : दक्षिण मुंबईचं फुफ्फुस म्हणून ओळख असणाऱ्या आणि कोट्यवधी रुपयांची किंमत असणाऱ्या महालक्ष्मी रेसकोर्सवर (Mahalaxmi Race Course)  थीम पार्क उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  त्यामुळे, रेसकोर्सच्या भाडेतत्त्वाचे नूतनीकरण करून 226 पैकी 120 एकर जागेवर थीम पार्क उभारता येणार आहे,  असं असलं तरी यावरून आरोपांची घोडदौड मात्र जोरात सुरू झालीय. त्यातच आदित्य ठाकरे यांच्या मतदारसघात हे रेसकोर्स येत असल्याने त्याला राजकीय वादाचीही किनार आहे..

 रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब (RWITC) ची काल यासंदर्भात आॅनलाइन बैठक पार पडली. या बैठकीत 1800 सदस्यांपैकी 708  सदस्य उपस्थित होते. ज्यातील 540  सदस्यांनी पुनर्विकास प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले, तर 168 सदस्यांनी विरोधात मतदान केले. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आता रेसकोर्सच्या भाडेतत्त्वाचे नूतनीकरण करून रेसकोर्सच्या 226 एकर जागेपैकी 120  एकर जागेवर थीम पार्क उभारता येणार आहे. 

रेस कोर्स व्यवस्थापनावर करार करण्यासाठी दबाव

महालक्ष्मी रेसकोर्सचा भूखंड 1914 मध्ये व्यवस्थापनाला भाडेतत्त्वावर देण्यात आला होता, ही भाडेपट्टी 2013 सालात संपली. अलिकडेच, महालक्ष्मी रेसकोर्ससंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरच आरोप केले होते. या जागेत व्यावसायिक बांधकामे आणि खासगी टॉवर होणार असल्याचा ठाकरेंचा दावा होता आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या जवळचा विकासक रेस कोर्स व्यवस्थापनावर करार करण्यासाठी दबाव आणत आणि धमकावत होता, असा आरोप केला होता. 

थीम पार्कसाठी 120 एकर तर टर्फ क्लबला 91 एकर जागेचे वाटप

दरम्यान, आरडब्ल्डूआयटीसीच्या सर्वसाधारण सभेनंतर आता राज्य सरकार, पालिका आणि रॉयल वेस्टर्स इंडिया टर्फ क्लबमध्ये कायदेशीर करार होताना दिसेल. ज्यात थीम पार्कसाठी 120 एकर तर टर्फ क्लबला 91 एकर जागेचे वाटप होईल. मात्र, ही मुंबईकरांच्या हक्काची जागा असल्याचा दावा माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केला आहे. त्यामुळे मुंबईकरांचं देखील मत विचारात घेतलं पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना ठाकरे गट काय भूमीका घेणार?

रेसकोर्सच्या जागेवरुन मागील अनेक दिवसांपासून वाद सुरु आहे. अशात, आता क्लबकडूनच पुर्नविकासावर मोहोर लावली गेली आहे. मात्र, यात देखील अनेक सदस्यांचा विरोध पाहायला मिळतोय.  त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे आपल्या मतदारसंघात असलेल्या रेसकोर्सबाबत आता पुढे काय भूमिका घेतात  हे बघणं महत्त्वाचे असेल

हे ही वाचा :

महालक्ष्मी रेसकोर्सची जागा बिल्डरकडून बळकावण्याचा प्रयत्न, आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget