एक्स्प्लोर

महालक्ष्मी रेसकोर्सची जागा बिल्डरकडून बळकावण्याचा प्रयत्न, आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप

रेस कोर्सवर काही जागा रेसिंगसाठी ठेवून इतर जागेवर हॉटेल्स बिल्डिंग उभारण्याचा डाव असल्याचं आदित्य ठाकरेंचं म्हणणं आहे.

मुंबई : महालक्ष्मी रेस कोर्स (Mahalaxmi Race Course)  पुन्हा एकदा  शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)  यांनी केलेल्या आरोपानंतर चर्चेत आला आहे.  महालक्ष्मी रेस कोर्सची जागा राज्य सरकारच्या जवळच्या बिल्डरकडून बळकवण्याचा प्रयत्न होत असून, संबंधित बिल्डर हा त्या ठिकाणच्या व्यवस्थापनाला धमकवत असून करार करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. रेस कोर्सवर काही जागा रेसिंगसाठी ठेवून इतर जागेवर हॉटेल्स बिल्डिंग उभारण्याचा डाव असल्याचं ठाकरेंचं म्हणणं आहे. मात्र या ठिकाणी थीम पार्क उभारण्याचा राज्य सरकारने मुंबई महापालिकेचा (BMC)  प्रयत्न आहे.  

शिवसेना ठाकरे गटाने हा रेसकोर्स  हलवला जात असेल आणि त्यासाठी जर खाजगी जागा संपादित केली जात असेल आणि त्यासाठी जर पैसे मोजले असतील तर त्याला विरोध दर्शवला आहे. रेसकोर्स हा सरकारी जागेवरच व्हावा, अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाने घेतली आहे.

महालक्ष्मी रेसकोर्सवर थीमपार्क साकारण्याचे प्रयत्न कुठपर्यंत आले ?

2013 साली महालक्ष्मी रेस कोर्सचा संबंधित करार हा संपुष्टात आला आणि त्यानंतर राज्य सरकारने रेस कोर्सची मालकी आपल्याकडे घेतली. मधल्या काळात मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये याच महालक्ष्मी रेस कोर्सच्या जागेवर थीम पार्क साकारण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मागील वर्षी मुंबई महापालिकेकडून थीम पार्क या रेस कोर्सवर तयार करण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यासाठी हालचाली देखील मुंबई महापालिकेने केल्या. जानेवारी 2023 मध्ये बीएमसीने राज्य सरकारला महालक्ष्मी 226 एकर ची जागा मुंबई महापालिकेला हस्तांतरित करावी अशा आशयाचे पत्र दिले. आतापर्यंत मुंबई महापालिकेची एकूण 226 एकर जागेपैकी 30 टक्के जागेवर मालकी आहे.  उर्वरित 70 टक्के जागेवर राज्य सरकारची मालकी आहे त्यामुळे थीम पार्क साकारायचा असेल तर संपूर्ण रेस कोर्सच्या जागेवर मालकी मुंबई महापालिकेला हवी होती.

करार करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप 

 नगर विकास विभागाने रेस कोर्स हलवण्यासाठी पर्यायी जागांचा विचार सुरू केला. यामध्ये प्रामुख्याने मुलुंड ग्राउंडचा सुरुवातीला विचार करण्यात आला. मात्र या ठिकाणी खाजगी विकासाकडून जमीन रेस कोर्ससाठी विकत घ्यावी लागणार होती आणि ते व्यवहार्य नसल्याने सिडकोच्या जागेवर विशेष करून खारघर आणि उरणमध्ये रेस कोर्स हलवण्यावर विचार झाला. तरीसुद्धा अद्याप अधिकृतरित्या कुठल्याही प्रकारचा निर्णय रेस कोर्स संदर्भात घेण्यात आलेला नाही. आता आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारच्या जवळच्या बिल्डरकडून संबंधित रॉयल वेस्टर्न इंडिया टर क्लब या व्यवस्थापनाला धमकावले जात असल्याचा आणि करार करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप केला आहे.

हे ही वाचा :

महाराष्ट्रात धृतराष्ट्रांचे सरकार; महानंद गुजरातला नेला तर आम्ही गप्प बसणार नाही, संजय राऊतांचा सरकारला इशारा

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

High Court on Alimony: पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा अधिक असल्यास पोटगीचा हक्क नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय, उच्चशिक्षित महिलेची याचिका फेटाळली
पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा अधिक असल्यास पोटगीचा हक्क नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय, उच्चशिक्षित महिलेची याचिका फेटाळली
Maharashtra Weather Rain Updates: महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस, कुठेकुठे कोसळणार?, सतत अतिवृष्टी का होतेय?, हवामान विभागाची A टू Z माहिती
महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस, कुठेकुठे कोसळणार?, सतत अतिवृष्टी का होतेय?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Sonam Wangchuk Protest Marathi News: सोनम वांगचुक यांनी जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण सोडलं; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, सगळं स्पष्ट करुन टाकलं!
सोनम वांगचुक यांनी जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण सोडलं; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, सगळं स्पष्ट करुन टाकलं!
Sonam Wangchuk Protest Marathi News मोठी बातमी: सोनम वांगचुक यांनी उपोषण घेतलं मागे; केंद्र सरकारकडून 3 अटी मान्य, जेपी नड्डा यांनी रुग्णालयात सगळं वाचून दाखवलं!
सोनम वांगचुक यांनी उपोषण घेतलं मागे; केंद्र सरकारकडून 3 अटी मान्य, जेपी नड्डा यांनी रुग्णालयात सगळं वाचून दाखवलं!

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget