एक्स्प्लोर

Lower Parel Bridge : अखेर मुंबईकरांची प्रतीक्षा संपली! पाच वर्षांनंतर लोअर परळचा पूल वाहतुकीसाठी खुला

Lower Parel Bridge : पाच वर्षांनंतर लोअर परळचा पूल हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

मुंबई : लोअर परळचा (Lower Parel) पुलामुळे गेली अनेक वर्ष मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. पण आता मुंबईकरांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. कारण लोअर परळचा पूल (Lower Parel Bridge) हा मागील पाच वर्षांपासून वाहतूकीसाठी बंद होता. तर हाच पूल आता खुला करण्यात आला आहे. खरतर लोअर परळवरुन प्रभादेवीकडे जाणारी मार्गिका ही 3 जून रोजी सुरु करण्यात आली होती. तर लोअर परळहून करी रोडकडे जाणारी एक मार्गिका ही येत्या सोमवारी म्हणजेच (18 सप्टेंबर) रोजी सुरु करण्यात येणार होती. पण बाप्पाच्या आगमानाने ही मार्गिका रविवार (17 सप्टेंबर) पासून सुरु करण्यात आली. 

दोन्ही गटाकडून सामंजस्याची भूमिका

हा पूल गणेश आगमनावेळी खुला व्हायला हवा नाहीतर आमचे कार्यकर्ते याच पुलावरुन बाप्पाला घेऊन जातील असा ईशारा आदित्य ठाकरेंनी दिला होता. त्यानुसार रविवार (17 सप्टेंबर) रोजी ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते बाप्पाची मूर्ती घेऊन पुलाजवळ पोहचले. मात्र यावेळी पोलिस प्रशासन आणि पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर आजच म्हणजे रविवार (17 सप्टेंबर) रोजी पुलाचं उद्घाटन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे बाप्पाच्या आगमनापासून हा पूल मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला आहे. 

गणरायाचं आगमन हेच पुलाचं अधिकृत उद्घाटन - केसरकर

दरम्यान पुलाच्या उद्घाटनाकरता इतर कोणत्याही औपचारिक शासकिय कार्यक्रमाची आवश्यकता नसल्याचं मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. तर गणरायाच्या आगमनामुळेच या पुलाचं उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे लोअर परळ  सार्वजनिक गणेशोत्सव डळाच्या गणेश मूर्तीची मिरवणूक या पुलावरुन काढण्यात आली. अगदी ढोलताशांच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात आली असून त्यानिमित्तानेच या पुलाचे देखील उद्घाटन करण्यात आले. 

पाच वर्ष पूल का बंद होता?

वरळी, डिलाईल रोड,करी रोड आणि लोअर परळला जोडणारा डिलाईल रोडचा  उड्डाणपूल धोकादायक असल्याचा अहवाल  आयआयटी मुंबईनं 2018 मध्ये दिला होता. मात्र वेगवेगळी कारणं देऊन गेली पाच वर्ष जुना पूल पाडून नवीन पूल उभारण्याचे काम गेली पाच वर्ष रखडवण्यात आले. तर या पुलाच्या कामामध्ये खडी घोटाळा झाला असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. त्यामुळे 48 तासांच्या मुदतीशिवाय प्रशासनाकडून वाहतूकीसाठी हा पुल खुला झाला नाही तर आम्हीच या पुलावरुन गणेश आगमनाची मिरवणूक काढू असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला होता. 

लोअर परळचा पूल म्हणजे, लालबाग, परळ, वरळी, प्रभादेवी यांना जोडणारा दुवा. गणेशोत्सवात लालबाग, परळमध्ये मोठी गर्दी असते. या काळात लोअर परळचा पूल वाहतूकीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. पण गेल्या पाच वर्षांपासून पूलाचं बांधकाम सुरू असल्यानं हा रस्ता पूर्णपणे बंद होता. अशातच आता ऐन गणेशोत्सवात हा पूल सुरू होणार असल्यामुळे लालबाग-परळकरांना खरंच वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे. 

हेही वाचा : 

Mumbai Pune Expressway : मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी, गणेशोत्सवासाठी मुंबईकर बाहेर पडल्याने गाड्यांची गर्दीच गर्दी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP MajhaSpecial Report Ramtek Constituency : रामटेक मतदारसंघात ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न?Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget