Mumbai Pune Expressway : मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी, गणेशोत्सवासाठी मुंबईकर बाहेर पडल्याने गाड्यांची गर्दीच गर्दी
Mumbai Pune Expressway Traffic News : मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर प्रवास करणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
Mumbai Pune Expressway Traffic News : गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक चाकरमानी मुंबईकर मोठ्या संख्येनं बाहेर मुंबई - पुणे हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून येतंय. या महामार्गावर वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक मंदावली आहे. अमृतांजन पुलाजवळ वाहनं कासवगतीने पुढं सरकत आहेत. कोणाला पर्यटनस्थळी तर कोणाला आपापल्या गावाला गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोहचायचं आहे. पण तत्पूर्वी या वाहतूक कोंडीचा सामना करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गावी जायची लगबग सध्या सुरू असून मुंबईतील अनेकजण बाहेर पडले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर गाड्यांची गर्दीच गर्दी झाल्याचं दिसून आलं. अनेक गाड्या एकाच वेळी हायवेवर आल्यामुळे ट्रॅफिक जॅम झालं आणि परिणामी वाहनांची गती मंदावली आहे. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाल्याचं दिसून येतंय.
गणेशभक्तांच्या मार्गात वाहतूक कोंडीचे विघ्न
गणेशोत्सवासाठी मुंबई गोवा महामार्गावर चाकरमान्यांच्या वाहनांची संख्या वाढल्याने पहाटेपासून महामार्गावर लहान मोठ्या वाहनांची मोठी रेलचेल असल्याचं दिसून आलं. महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून येतंय. इंदापूर , माणगाव नजीक वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. चाकरमानी ,कोकणवासीयांच्या मार्गात वाहतूक कोंडीचे विघ्न झाल्याने प्रवाशी आणि गणेशभक्त हैराण झाल्याचं चित्र आहे.
ही बातमी वाचा: