परराज्यातील नागरिक घरी परतणार; मुंबईच्या 14 पोलीस उपायुक्तांची नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक
परराज्यातील मजुरांना घरी पाठवण्यासाठी शासनाने परवानगी दिल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. अशातच मुंबई पोलीस दलातील 14 पोलीस उपायुक्तांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
मुंबई : परराज्यातील मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी मुंबई पोलीस दलातील 14 पोलीस उपायुक्तांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. आता सरकारी यंत्रणा या कामासाठी सज्ज झालेली आहे. श्रमिक स्पेशल ट्रेन आणि रस्ते वाहतूकीची व्यवस्था मजुरांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी करण्यात येत आहे. तसेच राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा पातळीवर जिल्हा अधिकारी ही प्रक्रिया पार पाडत आहेत.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक लोक घरांमध्ये अडकून पडले आहेत. याव्यतिरिक्त कामानिमित्त घरापासून दूर असणारे अनेक लोक आपल्या घरांपासून, राज्यापासून दूर अडकून पडले आहेत. अशातच अडकून पडलेल्या नागरिकांना आपापल्या घरी परतण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने कार्यपद्धती निश्चित केली असून राज्यातून बाहेर जाणारे आणि बाहेरच्या राज्यातून परत येणारे यासाठी प्रवास करणाऱ्या सर्वांचा समनव्य ठेवण्याची जबाबदारी तीन अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. तर आता परराज्यातील मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी मुंबईच्या 14 पोलीस उपायुक्तांची नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलीस उपआयुक्त प्रणय अशोक यांनी दिली आहे.
पाहा व्हिडीओ : मुंबईत स्वॅब टेस्ट, एक्स-रे चाचणी करणारी अत्याधुनिक फिरती बस
परराज्यांतील मजुरांना आपापल्या राज्यात परत पाठवण्यासाठी ज्या ट्रेन सोडण्यात येणार आहेत. त्या ट्रेनमध्ये 1000 पेक्षा अधिक प्रवाशांना सोडण्यात येणार आहे. तसेच बसमधून स्थलांतरीत होणाऱ्या प्रवाशांपैकी एका बसमध्ये फक्त 25 जणांना सोडण्यात येणार आहे. म्हणजेच, जर 5 लाख लोकांना दुसऱ्या राज्यात प्रवास करायचा असेल आणि 2 लाख लोकांना महाराष्ट्र मध्येच स्थलांतर करायचं असेल तर 500 ट्रेन आणि 800 बसेसची सोय करण्यात येणार आहे. त्यासाठी भारतात 30 हजार नॉन एसी कोचेसची व्यवस्था श्रमिक ट्रेनमध्ये तर एमएसटीआरसी (MSTRC)च्या 10 हजार आणि 500 खासगी बसेस तयार ठेवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, प्रत्येक पोलीस ठाण्यात पराराज्यातील मजुरांची यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी पोलीस उपायुक्तांना पाठवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या जाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या :
कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ठाण्यातचं मुक्काम
Lockdown3 | महाराष्ट्रात अंतर्गत प्रवास करण्यासाठी राज्य सरकारकडून नवीन नियमावली
महाराष्ट्रात आणखी एका कोरोना बाधित महिलेची यशस्वी प्रसूती; आईसह बाळ सुखरुप