बाळासाहेब ठाकरे यांच्या दक्षिण मुंबईतील पुतळ्याला स्थानिकांचा विरोध
जोगेश्वरीच्या मातोश्री क्लब मैदानात तयार करण्यात आलेला बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे दक्षिण मुंबईत 23 जानेवारीला उद्घाटन होणार आहे.
मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या दक्षिण मुंबईतील पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने म्हणजेच 23 जानेवारी रोजी होणार आहे. यामध्ये दिग्गज राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. पण या पुतळ्याला आपली मुंबई संस्था व कुलाब्यातील काही स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे.
नेमका विरोध कशासाठी आहे?
जोगेश्वरीच्या मातोश्री क्लब मैदानात तयार करण्यात आलेला बाळासाहेब ठाकरे यांच्या या पुतळ्याचे दक्षिण मुंबईत 23 तारखेला उद्घाटन होत आहे. पण ज्या भागात हा पुतळा होतोय त्या भागातील काही रहिवाशांनी हा पुतळा येथे न बसविता दुसरीकडे बसवावा अशी मागणी करत पुतळ्याला विरोध केला आहे. कारण ज्या रिगल सिनेमा आणि छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्राहलायच्या चौकात या पुतळ्याचे अनावरण करत आहे ती जागा रहदारीची असून सार्वजनिक रस्त्यावर पुतळा बसवला जाऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत
हा विरोध एकीकडे होत असला तरी दुसरीकडे मात्र राजकीय नेत्यांना 23 जानेवारीला बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमला बोलवले आहे. त्यामुळे राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस व इतर मंत्री नेते सुद्धा यावेळी आमंत्रित असणार आहेत. त्यामुळे एक मोठा कार्यक्रम या दिवशी पार पडणार आहे व तसं नियोजन असल्याच महापौरांनी सांगितले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सार्वजनिक ठिकणी पुतळा उभारायला परावनगी नसतानाचे आदेश असताना मुंबई हेरिटेज कांजरव्हेशन कमिटी व इतर प्रशासकीय परवानगी घेऊन हा पुतळा या ठिकणी बसवला गेल्याच महापालिकेला म्हणणं आहे. तर दुसरीकडे या ठिकाणी स्थानिकांचा कसलाच विरोध नसल्याचं महापालिका सत्ताधारी म्हणत आहे. त्यामुळे एकीकडे या बाळासाहेबांच्या पुतळ्याला होत असलेला विरोध तर दुसरीकडे पुतळ्याच्या अनावरणच्या कार्यक्रमला दिग्गजांना निमंत्रण देण्यात आले आहे. आता या प्रकरणात जर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचा अवमान आणि काही स्थानिकांचा विरोध जुगारुन पुतळ्याचा अनावरण होणार की या सगळ्याचा विचार प्रशासनाकडून केला जाणार हे आता 23 जानेवारीला पाहयला मिळणार आहे.
संबंधित बातम्या :