एक्स्प्लोर
Advertisement
Megablock : मुंबईकरांनो, आज घराबाहेर पडण्याआधी लोकलच्या प्रवासाचं नियोजन करा, मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
Mumbai Local Megablock : आज तांत्रिक काम आणि दुरुस्तीसाठी लोकलच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Local Megablock on 18 June, Sunday : मुंबईकरांनो आज, रविवारी सुट्टीनिमित्त बाहर जाण्याचा विचारात असाल, तर नियोजन करुनचं घराबाहेर पडा. आज मध्य रेल्वेकडून दोन मार्गावर मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी लोकल रेल्वेने (Central Railway Megablock Today) प्रवास करणार असाल, रेल्वेचं वेळापत्रक पाहून आधी नियोजन करा. आज तांत्रिक काम आणि दुरुस्तीसाठी लोकलच्या मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वेने प्रसिद्धीपत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे.
मध्य रेल्वे रविवार, 18 जून रोजी देखभालीचे काम करण्यासाठी उपनगरीय विभागांत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. याचं वेळापत्रक कसं आहे जाणून घ्या.
मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
- ठाणे - कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी 9.30 ते दुपारी 2.45 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील आणि निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
- कल्याण येथून सकाळी 10.28 ते दुपारी 3.25 पर्यंत सुटणाऱ्या अप जलद/अर्ध जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जाऊन दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील त्यानंतर मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि गंतव्यस्थानावर 10 मिनिटे उशिराने पोहोचेल.
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
- पनवेल - वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे बेलापूर/नेरुळ-खारकोपर रेल्वे सेवा प्रभावित होणार नाही.
- पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
- पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेल करीता जाणारी ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
- ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरूळ आणि खारकोपर दरम्यान उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे- वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.
- ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - वाशी मार्गावर विशेष उपनगरीय गाड्या धावतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement