एक्स्प्लोर
Advertisement
हिमांशू रॉय यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
गिरगावच्या चंदनवाडी स्मशानभूमीत हिमांशू रॉय यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुंबई : राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि एसटीएसचे माजी प्रमुख हिमांशू रॉय यांच्या आत्महत्येनं संपूर्ण पोलीस दलाला मोठा हादरा बसला आहे. त्यांच्यावर गिरगावच्या चंदनवाडी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी पोलीस महासंचालक सतीश माथूर आणि सह पोलीस आयुक्त देवेन भारती हे उपस्थित होते तर त्यांच्यासोबतच अमीन पटेल, बाळा नांदगावकर, रामदास आठवले यांनीही उपस्थिती लावली होती.
दीर्घ आजाराला कंटाळून हिमांशू रॉय यांनी आपलं जीवन संपवलं. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. हिमांशू यांनी त्यांच्या राहत्या घरी स्वत: वर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. त्यांच्या या आत्महत्येमुऴे संपूर्ण पोलिस दलामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
तोंडात गोळी मारुन आत्महत्या
हिमांशू रॉय यांनी स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून तोंडात गोळी मारुन आत्महत्या केली. तोंडातून गोळी आरपार झाल्यामुळे, त्यांच्या चेहऱ्याला जबर दुखापत झाली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
कोण होते हिमांशू रॉय?
हिमांशू रॉय हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. चार वर्ष मुंबई क्राईम ब्रान्चमध्ये काम केलं होतं. तर एटीएएस प्रमुख म्हणून ते अधिक चर्चेत आले.
हिमांशू रॉय यांनी अनेक हायप्रोफाईल प्रकरणं हाताळली. यात जे डे हत्याप्रकरण, आयपीएल सट्टेबाजी प्रकरणांचा समावेश होता.
हिमांशू रॉय घोड्यावरुन पडले तेव्हाच घात झाला!
मात्र दोन वर्षांपूर्वी त्यांना दुर्धर आजाराने ग्रासलं. त्यामुळे ते मेडिकल लीव्हवर होते. आजारपणामुळेच त्यांनी आयुष्य संपवलं असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु शवविच्छेदन अहवालातूनच खरं कारण समोर येईल.
हिमांशू रॉय यांनी 2013 मधील आयपीएलच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अनेक अटकसत्र केलं होतं. त्यांनीच विंदू दारासिंहला बेड्या ठोकल्या होत्या.
याशिवाय अजमल कसाबच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणीही हिमांशू रॉय यांच्याच नेतृत्त्वात झाली होती.
कॅन्सरवर मात, नैराश्याने हरवलं
पिळदार शरीरयष्टी असलेल्या हिमांशू रॉय यांची प्रकृती कॅन्सरमुळे खालावली होती. अशा परिस्थितीती आपल्याला कोणी पाहू नये, असं त्यांना वाटत होतं. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली होती. कॅन्सरवर मात करुन पुन्हा वर्दीमध्ये ड्यूटी जॉईन करण्याची त्यांची इच्छा होती. परंतु याचदरम्यान, त्यांना नैराश्येने ग्रासलं. त्याच डिप्रेशनमधून त्यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे.
संबंधित बातम्या
जेव्हा रॉय यांनी कसाबला गुपचूप पुण्याला नेलं होतं!
हिमांशू रॉय घोड्यावरुन पडले तेव्हाच घात झाला!
डॅशिंग हिमांशू रॉय यांचा अल्पपरिचय
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement