Navi Mumbai : सलग दोन दिवस लाखोंचे अमली पदार्थ जप्त, नवी मुंबई गुन्हे शाखेची कारवाई
Navi Mumbai : नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी ही परदेशी नागरिकाकडून लाखोंचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.
![Navi Mumbai : सलग दोन दिवस लाखोंचे अमली पदार्थ जप्त, नवी मुंबई गुन्हे शाखेची कारवाई Lakhs of drugs seized in the city for two days in a row, action taken by Navi Mumbai Crime Branch Navi Mumbai : सलग दोन दिवस लाखोंचे अमली पदार्थ जप्त, नवी मुंबई गुन्हे शाखेची कारवाई](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/22/d5fcca13b87c40e6499774ab516011bb_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Navi Mumbai : मागील दोन दिवसांपासून नवी मुंबई शहर आणि परिसरात लाखो रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. आज (मंगळवारी) तब्बल 22 लाखांचा अमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. नवी मुंबईतील ठाणे बेलापूर मार्गावर नायजेरियन नागरिक एमडी या अमली पदार्थाची विक्री करण्यास येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी सापळा रचत नायजेरियन नागरिकाला अटक केली. यावेळी त्या नायजेरियन नागरिकाकडून 22 लाख किमतीचे एम्फेटामाईन आणि मेथाक्युलॉन हे अमली पदार्थ जप्त केले आहेत.
सोमवारी देखील नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या बांग्लादेशी नागरिकाला अटक केली होती. त्याच्याकडून 13 लाख 25 हजार रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपटा फाटा
येथे अंमली पदार्थ विक्रीसाठी आरोपी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस पथकाने यावेळी संबधित बांग्लादेशी नागरिक विक्रिसाठी आल्यानंतर त्याला अटक केली. त्याच्याकडून सुमारे 13 लाख 25 हजारांचे अंमली पदार्थ जप्त केले.
आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी
आरोपी मुसा सुलतान याला अटक करून त्याच्या जवळील 13 लाख 25 हजार रुपयांचे मेथ एम्फेटामाईन आणि काही अमली पदार्थाच्या गोळ्या जप्त केल्या. त्याच बरोबर त्याच्याकडून बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड, जन्मदाखला देखील पोलिसांना मिळाला आहे. त्यामुळे आरोपीवर एनडीपीएस कायदा, पारपत्र नियम, परकीय नागरिकांचा कायदा या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून आरोपीने सदरचे अंमली पदार्थ कुठून आणले आणि कोणाला विकणार होता, तसेच त्याने बनावट कागदपत्रे कुठे बनवली असा विविध तपास पनवेल तालुका पोलीस करत आहेत.
- Navi Mumbai Election : नवी मुंबई पालिका प्रभाग रचनेतील घोळांबाबत अनेक हरकती, 122 वाॅर्डांसाठी 3 हजार 800 हरकती
- फिल्मी नाही सत्य! आधी गुन्हे करायचा मग कथा लिहायचा! पुण्यातील लेखकाला बेड्या, पोलिसही चक्रावले
- धक्कादायक : नोकरीच्या नावाखाली फसवणूक; तरुणाच्या शरीरातून काढलं 4800 ML रक्त
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)