एक्स्प्लोर

Kripashankar Singh | कृपाशंकर सिंह यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी, कारण...

कृपाशंकर सिंह मुंबईमधील मोठा उत्तर भारतीय चेहरा म्हणून ओळखले जातात. दिवंगत विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना कृपाशंकर सिंग हे राज्यमंत्री होते. संजय निरुपम यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर कृपाशंकर सिंग अस्वस्थ होते.

मुंबई : मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. माजी मंत्री आणि काँग्रेसचे माजी मुंबई प्रदेशाध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. कृपाशंकर सिंह उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत. आज सकाळी बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनीही आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

दिल्लीत आज मुंबईतील विधानसभा जागांविषयी स्क्रिनिंग कमिटीची बैठक होती. या बैठकीत सर्व माजी मुंबई अध्यक्षांना त्यांची मते जाणून घेण्यासाठी बोलवले होते. या बैठकीत काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे आणि कृपाशंकर सिंह यांच्यात तिकीट वाटपावरुन वाद झाला. त्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी कृपाशंकर सिंह यांना पाच मिनिटात मुंबईचा फीडबॅक देण्यास सांगितले. मात्र पाच मिनिटात मुंबईतील सर्व जागांविषयी कसं सांगू शकणार? असं कृपाशंकर यांनी म्हटलं. तसेच मुंबई काँग्रेसच्या कामकाजाविषयीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

कृपाशंकर सिंह यांनी आपला मुद्दा मांडण्यासाठी वेळ मागितला. त्यावर मल्लिकार्जुन खरगे यांनी उद्या लेखी आपले मत पाठवा आणि तुम्हाला येण्याची गरज नाही, असं सांगितलं. मात्र मल्लिकार्जुन खरगे यांचं वागणं कृपाशंकर सिंह यांना खटकलं आणि त्यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना राजीनामा पाठवला. कृपाशंकर सिंह भापपच्या वाटेवर असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होतीच, त्यात त्यांना आज कारणही मिळालं.

काँग्रेस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कृपाशंकर सिंह आपला मुलगा नरेंद्र याला विधानसभा निवडणुकीत उतरवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र काँग्रेसचा त्याला विरोध आहे. काँग्रेसची अवस्था सध्या बिकट आहे, अशा परिस्थितीत काँग्रेसच्या सर्व दिग्गज नेत्यांना निवडणुकीत उतरवण्यासाठी काँग्रेस इच्छुक आहे. त्यामुळे कृपाशंकर सिंह यांनीच निवडणूक लढवावी, अशी मल्लिकार्जुन खरगे यांची इच्छा आहे. मात्र आपल्या कलिना विधानसभा मतदारसंघातून कृपाशंकर सिंह यांना आपल्या मुलाला निवडणुकीत उतरवायचं आहे.

मुंबईतील उत्तर भारतीय चेहरा

कृपाशंकर सिंह मुंबईमधील उत्तर भारतीय चेहरा म्हणून ओळखले जातात. दिवंगत विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना कृपाशंकर सिंग हे राज्यमंत्री होते. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आरोप झाल्यानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई झाली होती.

संजय निरुपम यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर कृपाशंकर सिंग अस्वस्थ होते. निरुपम यांना हटवण्यात यावे आणि मिलिंद देवरा यांना नेतृत्व द्यावे, ही मागणी दिल्लीत करण्यात कृपाशंकर सिंग देखील एक नेते होते.

काँग्रेसमधील एकूण कार्यशैलीबाबत कृपाशंकर सिंह नाराज होते. गेली दोन वर्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गणपती निमित्त कृपाशंकर सिंह यांच्या घरी आवर्जून हजेरी लावत होते. तसेच यावर्षी उद्धव ठाकरे यांनींही त्यांच्या घरच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं होतं. त्यामुळे कृपाशंकर सिंह भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होतीच. 370 कलम हटवल्यानंतर यानिर्णयचे स्वागत त्यांनी केलं होतं.

उर्मिला मातोंडकरचाही काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षांतर्गत गट-तट आणि राजकारण यांना कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी प्रसिद्धी पत्रात म्हटलं आहे. मुंबई काँग्रेससाठी मोठ्या उद्दिष्टांकरता काम करण्याऐवजी पक्षातल्या अंतर्गत स्वार्थी प्रवृत्ती आणि त्यांच्यातल्या लढायांसाठी माझा वापर करु देणं माझ्या राजकीय आणि सामाजिक जाणीवांना मान्य नाही," असंही उर्मिलाने निवेदनात म्हटलं आहे.

संबंधित बातम्या
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑक्टोबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑक्टोबर 2025 | सोमवार
अजित दादा गणितात अतिशय हुशार; रुपाली चाकणकारांची भावनिक पोस्ट; अंजली दामानियांचा कडक रिप्लाय
अजित दादा गणितात अतिशय हुशार; रुपाली चाकणकारांची भावनिक पोस्ट; अंजली दामानियांचा कडक रिप्लाय
HDFC Life : संयत गळती : निवृत्त व्यक्तींच्या बचतीमध्ये हळूहळू होणारी घट आणि ती रोखण्याचे उपाय
संयत गळती : निवृत्त व्यक्तींच्या बचतीमध्ये हळूहळू होणारी घट आणि ती रोखण्याचे उपाय
Nashik Crime: मामा राजवाडे, अजय बागुलनंतर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या; 'नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला' घेतलं वदवून
मामा राजवाडे, अजय बागुलनंतर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या; 'नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला' घेतलं वदवून
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Live Superfast News :5.30 PM महाराष्ट्र लाईव्ह सुपरफास्ट बातम्या 13 OCT 2025 : ABP Majha
Sharad Pawar On Sangram Jagtap  : 'जातीजातीत तणाव निर्माण होईल अशी विधानं चुकीची' - शरद पवार
Ghatkopar Fire: घाटकोपरच्या गोल्ड क्रश इमारतीला लागलेल्या आगीवर नियंत्रण
Maratha-OBC : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर Vijay Wadettiwar यांचा यू-टर्न?, जुना व्हिडिओ व्हायरल
Eknath Shinde Scheme : शिंदेंची 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' योजना बंद? सरकार म्हणतंय..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑक्टोबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑक्टोबर 2025 | सोमवार
अजित दादा गणितात अतिशय हुशार; रुपाली चाकणकारांची भावनिक पोस्ट; अंजली दामानियांचा कडक रिप्लाय
अजित दादा गणितात अतिशय हुशार; रुपाली चाकणकारांची भावनिक पोस्ट; अंजली दामानियांचा कडक रिप्लाय
HDFC Life : संयत गळती : निवृत्त व्यक्तींच्या बचतीमध्ये हळूहळू होणारी घट आणि ती रोखण्याचे उपाय
संयत गळती : निवृत्त व्यक्तींच्या बचतीमध्ये हळूहळू होणारी घट आणि ती रोखण्याचे उपाय
Nashik Crime: मामा राजवाडे, अजय बागुलनंतर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या; 'नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला' घेतलं वदवून
मामा राजवाडे, अजय बागुलनंतर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या; 'नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला' घेतलं वदवून
चीननंतर आता अमेरिकेची भारताच्या क्षेपणास्त्र चाचण्यांवर हेरगिरी? हिंदी महासागरात ओशन टायटन दिसल्याने खळबळ
चीननंतर आता अमेरिकेची भारताच्या क्षेपणास्त्र चाचण्यांवर हेरगिरी? हिंदी महासागरात ओशन टायटन दिसल्याने खळबळ
संतापजनक! प्रेताला चाचपून पाहिलं , अंगावरच्या दागिन्यांसह अस्थीही लंपास केल्या, जळगावात आठवड्यात सलग दुसरा प्रकार
संतापजनक! प्रेताला चाचपून पाहिलं , अंगावरच्या दागिन्यांसह अस्थीही लंपास केल्या, जळगावात आठवड्यात सलग दुसरा प्रकार
राष्ट्रवादीच्या संग्राम जगतापांची हिंदुत्ववादी वाटचाल, अहिल्यानगर जिल्ह्यात विखे पाटलांना शह देणार का?
राष्ट्रवादीच्या संग्राम जगतापांची हिंदुत्ववादी वाटचाल, अहिल्यानगर जिल्ह्यात विखे पाटलांना शह देणार का?
Raju Nerlekar Kolhapur scam: कोल्हापूरचा 'हर्षद मेहता' राजू नर्लेकरच्या मुसक्या आवळल्या; कोल्हापूरसह दक्षिण भारतात अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा
कोल्हापूरचा 'हर्षद मेहता' राजू नर्लेकरच्या मुसक्या आवळल्या; कोल्हापूरसह दक्षिण भारतात अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा
Embed widget