एक्स्प्लोर
Maharashtra Live Superfast News :5.30 PM महाराष्ट्र लाईव्ह सुपरफास्ट बातम्या 13 OCT 2025 : ABP Majha
सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि माजी कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शेतकरी कर्जमाफीच्या (Farm Loan Waiver) मुद्द्यावर महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. 'गरज पडल्यास शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारने कर्ज काढावं आणि दिलेलं वचन पाळलं पाहिजे', असे म्हणत सत्तार यांनी आपल्याच सरकारला जाहीरनाम्याची आठवण करून दिली आहे. दुसरीकडे, जळगावमध्ये व्हॉट्सअॅपच्या (WhatsApp) ऑटो डाउनलोड सेटिंगमुळे निलेश सराफ नावाच्या व्यक्तीला तब्बल पावणे पाच लाखांचा सायबर फटका बसला आहे. पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मोठी घोषणा केली असून, खचलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीसाठी ३० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच, राज्य परिवहन मंडळाने 'आवडेल तिथे प्रवास' योजनेच्या पास दरात कपात करून प्रवाशांना दिवाळीची भेट दिली आहे, तर बीड पोलिसांनी नऊ महिन्यांत सहाव्यांदा एका टोळीवर मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई केली आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















