एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'नर्स'च्या हाती BMC ची कमान, मुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर यांची नियुक्ती निश्चित
विधानसभा निवडणुकीनंतर भाजप-सेनेत आलेल्या दुराव्यामुळे भाजप शिवसेनेच्या विरोधात महापौरपदाचा उमेदवार उभा करण्याची दाट शक्यता होती. मात्र, अखेरीस महापौरपदाची माळ शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका किशोरी पेडणेकरांच्या गळ्यात पडली आहे.
मुंबई : मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. पेडणेकर वगळता इतर कोणत्याही पक्षानं उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत. त्यामुळे मुंबई महापालिका महापौरपदावर किशोरी पेडणेकरांची नियुक्ती निश्चित झाली आहे. 22 नोव्हेंबरला होणारी महापौरपदाची निवडणूक बिनविरोध होत असली तरी शिवसेनेसाठी ती धाकधुक वाढवणारी होती. विधानसभा निवडणुकीनंतर भाजप-सेनेत आलेल्या दुराव्यामुळे भाजप शिवसेनेच्या विरोधात महापौरपदाचा उमेदवार उभा करण्याची दाट शक्यता होती. मात्र, अखेरीस महापौरपदाची माळ शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका किशोरी पेडणेकरांच्या गळ्यात पडली आहे. तर उपमहापौरपदासाठी अॅड. सुहास वाडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरुन ही नियुक्ती झाल्याचं विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितलं.
मुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून किशोरी पेडणकर यांचा अर्ज
किशोरी पेडणेकर यांचा परिचय शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आहेत. कायम विरोधकांना परखड उत्तर देणाऱ्या नेत्या अशी ओळख वरळीला शिवसेनेचा गड बनवण्यात मोठा वाटा वरळीत आदित्य ठाकरेंसाठी विधानसभा निवडणूकीत प्रचाराची आघाडी सांभाळली सध्या असलेली पदे - स्थायी समिती सदस्य... - रायगड, शिर्डी जिल्हा महिला संघटक पेडणेकर यांचा राजकीय अनुभव 2002 मध्ये मुंबई महानगर पालिकेत प्रवेश त्यानंतर 2012 प्रभाग समिती अध्यक्ष महिला बालकल्याण समिती अध्यक्ष 2013 स्थापत्य समिती शहर अध्यक्ष 2017 सुधार समिती , स्थायी समिती सदस्य, प्रभाग समिती अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली नगरसेवक पदाची 3 री टर्म यापूर्वी 2 वेळा जी साऊथ प्रभाग समिती अध्यक्षपद राजकिय, सामाजिक अनुभव शिवसेनेच्या 'प्रथम ती' या महिला सबलीकरणाच्या उपक्रमात सहभाग शिवसेनेत सक्रिय झाल्यानंतर शिवसैनिक म्हणून राजकीय जबाबदारी सांभाळत नर्स म्हणून नोकरीही करत होत्या निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख आदित्य ठाकरे आणि विशेषत: रश्मी ठाकरे यांच्या पाठिंब्यामुळे मातोश्रीकडून महापौरपदासाठी किशोरी पेडणेकरांना ग्रिन सिग्नलअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement