एक्स्प्लोर

मुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून किशोरी पेडणकर यांचा अर्ज

मुंबई महापालिका महापौरपदासाठी खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालं आहे. त्यामुळे मुंबईच्या महापौरपदासाठी अनेक नगरसेवकांनी दावा केला होता.

मुंबई : मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. तर उपमहापौरपदासाठी अॅड. सुहास वाडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरुन ही नियुक्ती झाल्याचं विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितलं. शिवसेनेतील अंतर्गत स्पर्धा सोडवण्यासाठी आणि नाराज इच्छुकांची समजूत काढण्यासाठी शिवसेना नेते अनिल परब मुंबई महापालिकेत दाखल झाले. अनिल परब यांच्या उपस्थितीतच किशोरी पेडणेकर यांचा महापौरपदाचा अर्ज दाखल करण्यात आला. मुंबई महापालिका महापौरपदासाठी खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालं आहे. त्यामुळे मुंबईच्या महापौरपदासाठी अनेक नगरसेवकांनी दावा केला होता. यशवंत जाधव, मंगेश सातमकर, आशिष चेंबुरकर, विशाखा राऊत, शेखर वायंगणकर यांनी महापौरपदासाठी दावा केला होता. मात्र किशोरी पेडणेकर आणि यशवंत जाधव यांची नावं आघाडीवर होती. अखेरच्या क्षणी यशवंत जाधव यांचं नाव पिछाडीवर पडलं आणि किशोरी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. भाजपचा उमेदवार न देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेत महापौरपदासाठी भाजप उमेदवार देणार नाही. मुंबई महापालिकेत भाजप पहारेकरीच्या भूमिकेत कायम राहणार असल्याचं समोर येत आहे. आवश्यक नगरसेवक संख्याबळ भाजपकडे नसल्याने निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र 2022 ला मुंबईत भाजपचा महापौर असेल, असं भाजपचे गटनेते आणि खासदार मनोज कोटक मनोज कोटक यांनी म्हटलं आहे. सध्या राज्यात आणि राष्ट्रीय पातळीवर भाजप-शिवसेनेत सुरु असलेला सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भाजप महापौर निवडणुकीत काय भूमिका घेते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र राज्यातील सत्ता स्थापनेच्या संघर्षाचे पडसाद तूर्तास तरी मुंबई महापालिकेत उमटणार नाहीत. संबंधित बातमी Mumbai Mayor | मुंबई महापौर पदासाठी भाजप उमेदवार देणार नाही, सूत्रांची माहिती
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar PC : सयाजी शिंदे राष्ट्रवादीत, जबाबदारी काय? अजितदादा काय म्हणाले?Nashik Shree Ram Murti : नाशिक तपोवनमध्ये 70 फूट श्रीरामाच्या भव्य मूर्तीचे लोकार्पणRahul Shevale PC | शिंदेंच्या दसरा मेळाव्यात 2 लाखांपेक्षा जास्त शिवसैनिक येतील- राहुल शेवाळेNavneet Rana PadYatra | नवरात्री निमित्ताने राणा दाम्पत्याची अंबादेवी मंदिरात पदयात्रा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Raj Thackeray SSC: राज ठाकरेंना 10 वीच्या बोर्ड परीक्षेत किती मार्क?;  मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
राज ठाकरेंना 10 वीच्या परीक्षेत किती मार्क?; मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Maharashtra Rain : कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा; विधानसभेपूर्वीच काढला हुकमी एक्का
सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा; विधानसभेपूर्वीच काढला हुकमी एक्का
Embed widget