एक्स्प्लोर

Kirit Somaiya : SRA घोटाळ्याबाबत वर्षभरापूर्वी तक्रार, पण ठाकरेंच्या दबावामुळे किशोरी पेडणेकरांविरोधात चौकशी नाही; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

Kishori Pednekar : किरीट सोमय्या यांनी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. केवळ एक प्रकरण नाही, तर एसआरएच्या अनेक प्रकरणांमध्ये पेडणेकर यांनी घोटाळा केल्याचं सोमय्या म्हणालेत.

Kirit Somaiya VS Kishori Pednekar : भाजप नेते किरीट सोमय्यांनी ( Kirit Somaiya ) पत्रकार परिषद घेत माजी महापौर किशोरी पेडणेकर ( Kishori Pednekar ) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. केवळ एक प्रकरण नाही, तर एसआरएच्या अनेक प्रकरणांमध्ये किशोरी पेडणेकर यांनी घोटाळा केल्याचं किरीट सोमय्या म्हणाले आहेत. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आलं आहे. किशोरी पेडणेकर यांना पुन्हा एकदा दादर पोलिसांनी एसआरए घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी बोलावलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यासंदर्भात आज सोमय्यांनी कागदपत्रं जमा केली. पेडणेकर यांनी कोविड काळात घोटाळा केल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. सोमय्या यांनी या विषयावर प्रसारमाध्यमांशी पत्रकार परिषदेत संवाद साधला.

'SRA घोटाळ्याबाबत वर्षभरापूर्वी तक्रार'

एसआरए घोटाळ्याबाबत वर्षभरापूर्वी तक्रार केली होती, पण उद्धव ठाकरेंच्या दबावामुळे किशोरी पेडणेकरांविरोधात चौकशी झाली नाही, असा गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. सोमय्यांनी या प्रकरणात आरोप केला आहे की, ठाकरे सरकारला पुरावे दिले होते, मात्र ठाकरे यांच्या सीएमओकडून दबाव आल्यानं घोटाळ्याची चौकशी झाली नाही. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलणं झाल्याचंही सोमय्यांनी सांगितलं आहे. किशोरी पेडणकर यांच्यावर सोमय्यांनी तक्रार दाखल केली असून पेडणेकरांवर सहा ठिकाणी तक्रार दाखल असल्याची माहिती सोमय्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. 

'दिवंगत भावाच्या नावावर पेडणेकरांनी फसवणूक केली'

दरम्यान, भारत सरकारच्या कंपनी मंत्रालयानं तक्रारीची दाखल घेतल्याचं सोमय्यांनी सांगितलं आहे. या प्रकरणाची उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे, एसआरएनं चौकशी सुरु केली आहे, असं सोमय्यांनी म्हटलं, शिवाय एसआरएच्या सीईओंशी बोलल्याचं ही त्यांनी सांगितलं आहे. इतकंच नाही तर किशोरी पेडणेरकर यांनी घोटाळा कमवून पैस कमवून घोटाळा करून बेनामी संपत्ती कमवल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. तसेच दिवंगत भावाच्या नावावर किशोरी पेडणेकर यांनी फसवणूक केल्याचा आरोपही सोमय्यांनी केलाय.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या आज मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात आणखी एका एसआरए घोटाळ्याप्रकरणी कागदपत्रं माध्यमांसमोर आणली. गोमातानगर एसआरए प्रकल्पात पेडणेकर यांचे गाळे असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर पेडणेकर यांनी काल पत्रकारांसह गोमाता नगरमध्ये जाऊन आपला गाळा असेल तर टाळे ठोकेन असं आव्हान दिलं होतं. त्यानंतर दादरमधील एका एसआरए प्रकल्पाबाबत पोलीस पेडणेकर यांची चौकशी करणार असल्याची माहिती समोर आलीय. या प्रकरणी पोलीस पेडणेकर यांना आज चौकशीसाठी पुन्हा समन्स धाडलं आहे. या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी पेडणेकरांविरोधात एसआरए घोटाळ्याची कागदपत्रं माध्यमांसमोर सादर केलीत.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Tukaram Mundhe FDA : तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget