Kishori Pednekar : वरळीतील एसआरए घोटाळा आणि किशोरी पेडणेकरांचा काय संबंध?
Kishori Pednekar : शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता पुन्हा एकदा ठाकरे गटाचे सेना नेते रडारवर आलेत. अनिल परब, संजय राऊत यांच्यानंतर आता किशोरी पेडणेकर यांचा नंबर लागणार का?
Kishori Pednekar : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासमोर आता अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर SRA संबंधित घोटाळ्यात आरोप केले होते. त्यानंतर दादर पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यात आली. ज्या ठिकाणी एसआरए घोटाळ्याप्रकणाचे आरोप होतायेत त्या वरळी गोमाता नगर येथील एसआरए इमारतींमध्ये आज किशोरी पेडणेकर यांनी भेट दिली. तसंच, आरोपांआडून आपल्यावर विरोधकांकडून दबावतंत्राचा वापर होत असल्याचा आरोप केलाय.
मुंबईच्या माजी महापौर असलेल्या किशोरी पेडणेकर यांचं कोविड काळात केलेल्या कामानं बरंचसं कौतुकही झालं. मात्र, कोविड काळातील कंत्राट घोटाळ्याचे आणि वरळी गोमाता नगरमधील एसआरए घोटाळ्याचे आरोप भाजप नेते किरीट सौमैय्यांनी किशोरी पेडणेकरांवर केले आहेत. यापैकी सध्या गोमाता नगरमधील एसआरए घोटाळ्यात माजी महापौरांच्या नावाची चर्चा आहे. दादर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसआरएमध्ये घर देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी जूनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. एका पालिका अधिकाऱ्याच्या संगनमताने ही फसवणूक झाली. यामध्ये चार जणांना अटकही करण्यात आली. यामध्ये पेडणेकर यांच्या जवळच्या व्यक्तीसह पालिका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. पालिका कर्मचाऱ्याच्या जबाबात पेडणेकर यांच्या नावाचा उल्लेख झाल्याची माहिती समोर येत आहे. दाखल गुन्ह्यात आरोपींमध्ये सध्या किशोरी पेडणेकर यांचे नाव नाही. सध्या याच प्रकरणात त्यांच्यावर होत असलेले आरोप आणि समोर आलेल्या माहितीच्या आधारे त्यांना चौकशीला बोलाविण्यात आले होतं.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता पुन्हा एकदा ठाकरे गटाचे सेना नेते रडारवर आलेत. अनिल परब, संजय राऊत यांच्यानंतर आता किशोरी पेडणेकर यांचा नंबर लागणार का? अशी चर्चा आता राजकिय वर्तृळात आहे...त्यामुळे, आता पूर्वाश्रमीच्या सहका-यांविरोधात होत असलेल्या आरोपां प्रकरणी शिंदे सरकार काय पावलं उचलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
एसआरए घोटाळा आणि किशोरी पेडणेकरांचा संबंध काय?
SRA घोटाळ्यातील आरोपीशी झालेल्या व्हाट्सपवरील संभाषणामुळे किशोरी पेडणेकर अडचणीत आल्या आहेत.
दादर पोलिसांनी जून महिन्यात दाखल झालेल्या SRA प्रकल्पाशी संबंधित एका गुन्ह्यात पेडणेकर यांची चौकशी सुरू केली आहे..
SRA मधील घर स्वस्तात मिळवून देतो असं सांगून लोकांकडून पैसे उकळनाऱ्या तीन आरोपींना दादर पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपींमध्ये एक महापालिकेचा कर्मचारी आहे. संजय लोखंडे असे या आरोपीचे नाव असून तो वसाहत विभागामध्ये नोकरीस आहे.
संजय लोखंडे, संजय कांबळे व आणखी एक हे तीनही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत..या प्रकरणात आणखी तीन आरोपी आहेत.
SRA मधली घर स्वस्तात मिळवून देतो असे सांगून आरोपींनी 1 कोटी 35 लाख रुपये लोकांकडून उकळल्याच तपासात समोर आलंय.
एकूण 9 लोकांकडून कडून हे पैसे घेण्यात आले होते.
यामधला संजय लोखंडे आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचे काही व्हाटसपचॅट पोलिसांच्या हाती लागलेत त्यावरून त्यांना चौकशीला बोलावण्यात आले होते.
स्वस्तात फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली केलेली फसवणूक या आरोपाव्यतिरीक्त याच वरळी गोमाता नगर मधील काही गाळ्यांचा ताबा किशोरी पेडणेकरांकडे आहे असा दुसरा आरोप किरीट सौमैय्यांनी केला आहे.