एक्स्प्लोर

उद्धव ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्तीचं किरीट सोमय्यांकडून समर्थन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाविरोधात वडाळात राहणाऱ्या हिरामणी तिवारी या व्यक्तीनं फेसबूक पोस्ट टाकली होती.

मुंबई : मुंबईतल्या वडाळ्यामध्ये शिवसैनिकांनी फेसबूक पोस्टवरून एका व्यक्तीला मारहाण केली होती. आता शिवसैनिकांविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आवाज उठवला आहे. पिडीत तरूणाच्या समर्थनात किरीट सोमय्या यांनी भूमिका घेत थेट वडाळा पोलीस स्टेशन गाठलं आहे. एवढचं नाहीतर हिरामणींना मारहाण करणाऱ्या व्यक्तीला अटक का केली गेली नाही?, असा सवालही सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. आज किरीट सोमय्या हिरामणी तिवारींच्या मदतीला वडळ्यात पोचल्यानंतर मोठ्या संख्येनं शिवसैनिक देखील या भागात दाखल झाले होते. त्यामुळे काही काळ या भागात तणाव वाढला होता. सध्या पोलिसांकडून या भागात अधिकची कुमक बोलवून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काय आहे हे प्रकरण? शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरें विरोधात फेसबूकरवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याला शिवसैनिकांनी चोप दिला होता. एवढचं नाहीतर भर चौकात त्याचे केस कापून टक्कल करण्यात आलं होतं. मुंबईतील वडाळ्यात ही संतापजनक घटना घडली होती. दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर 15 डिसेंबर रोजी जामिया मिलिया इस्लामियातील विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती. या घटनेचा निषेध देशभरातील विविध ठिकाणांहून करण्यात येत होता. याबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाविरोधात वडाळात राहणाऱ्या हिरामणी तिवारी या व्यक्तीनं फेसबूक पोस्ट टाकली होती. मात्र त्याला विरोध करताना शिवसैनिकांनी मात्र कायदाच हातात घेतला होता. मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले होते? जामिया विद्यापीठातील हिंसाचार जालियनवाला बाग हिंसाचाराची आठवण करून देणारा आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले होते. देशातील तरूणांना बिथरवू नका, असा इशाराही त्यांनी केंद्र सरकारला दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील जामिया विद्यापीठातील हिंसाचारावर पहिल्यांदाच भाष्य केले होते. संबंधित बातम्या :  उद्धव ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्याला शिवसैनिकांकडून चोप, मुंबईतल्या वडाळ्यातील संतापजनक घटना
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC commissioner : मुंबई महानगरपालिकेचा नवा आयुक्त कोण होणार? 'या' पाच नावांची जोरदार चर्चा, कोण मारणार बाजी?
मुंबई महानगरपालिकेचा नवा आयुक्त कोण होणार? 'या' पाच नावांची जोरदार चर्चा, कोण मारणार बाजी?
Maharashtra Weather Update : शेतकऱ्यांनो सावधान! काढणी केलेल्या पिकांची काळाजी घ्या, राज्यभरात पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस अन् गारपीटीचे संकट, IMDचा अंदाज काय?
शेतकऱ्यांनो सावधान! काढणी केलेल्या पिकांची काळाजी घ्या, राज्यभरात पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस अन् गारपीटीचे संकट, हवामान विभागाचा अंदाज काय?
धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळणार का? अशोक खरातचं नाव घेत छगन भुजबळांच मिश्कील उत्तर, पत्रकारांमध्येही हशा पिकला
धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळणार का? अशोक खरातचं नाव घेत छगन भुजबळांच मिश्कील उत्तर, पत्रकारांमध्येही हशा पिकला
Deepak Kesarkar : अशोक खरातच्या कृत्यात सहभागी नाही, कुठल्याही महिलेची ओळख करून दिली नाही; दीपक केसरकरांनी मौन सोडलं
अशोक खरातच्या कृत्यात सहभागी नाही, कुठल्याही महिलेची ओळख करून दिली नाही; दीपक केसरकरांनी मौन सोडलं

व्हिडीओ

Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प
Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report
Nashik leopard : नागरी वस्तीत बिबट्या शिरला, नागरिकांमध्ये दहशत Special Report
Jyoti Waghmare Nanded | ज्या माणसाला स्वतःचं घर सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC commissioner : मुंबई महानगरपालिकेचा नवा आयुक्त कोण होणार? 'या' पाच नावांची जोरदार चर्चा, कोण मारणार बाजी?
मुंबई महानगरपालिकेचा नवा आयुक्त कोण होणार? 'या' पाच नावांची जोरदार चर्चा, कोण मारणार बाजी?
Ashok Kharat ED probe: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? राजकारण्यांचा काळा पैसा व्याजाने दिल्याचा संशय
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? राजकारण्यांचा काळा पैसा व्याजाने दिल्याचा संशय
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, यूनियन बँक, बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँकेला आरबीआयचा दणका, आर्थिक दंड ठोठावला
यूनियन बँक, बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँकेला आरबीआयचा दणका, आर्थिक दंड ठोठावला
Maharashtra Live blog updates: ठाणे शहरात बहुतांश ठिकाणी बत्ती गूल, तापमाणाचा पारा वाढलेला असताना रविवार सुट्टीच्या दिवशी नागरिकांचे हाल
Maharashtra Live blog updates: ठाणे शहरात बहुतांश ठिकाणी बत्ती गूल, तापमाणाचा पारा वाढलेला असताना रविवार सुट्टीच्या दिवशी नागरिकांचे हाल
Gold Price Crash : सेंट्रल बँकांची विक्रमी खरेदी, तरीही सोन्याची किंमत का घसरतेय? जाणून घ्या 2 मोठी कारणं
सेंट्रल बँकांची विक्रमी खरेदी, तरीही सोन्याची किंमत का घसरतेय? जाणून घ्या 2 मोठी कारणं
Gold Price Update : एका महिन्यात सोने 24529 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 68210 रुपयांनी घसरले, दर कोसळण्याचं नेमकं कारण जाणून घ्या
एका महिन्यात सोने 24529 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 68210 रुपयांनी घसरले, दर कोसळण्याचं नेमकं कारण जाणून घ्या
Ashok Kharat: अशोक खरातच्या केबिनमधील खास बनावटीच्या काचा पाहून पोलीस थक्क, नेमकं काय घडलं?
Ashok Kharat: अशोक खरातच्या केबिनमधील खास बनावटीच्या काचा पाहून पोलीस थक्क, नेमकं काय घडलं?
Iran War Update : होर्मुझ आता 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' म्हणून ओळखणार, युद्ध थांबवण्यासाठी इराणची याचना; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझ आता 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' म्हणून ओळखणार, युद्ध थांबवण्यासाठी इराणची याचना; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Embed widget