एक्स्प्लोर
मुंबई महापालिकेच्या टँकर घोटाळ्यात शिवसेनेचा हात: सोमय्या
मुंबई : भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. टँकर घोटाळ्यात महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा हात असल्याचं सोमय्यांनी म्हटलं आहे.
टँकर माफिया, पालिका अधिकारी आणि सत्ताधारी शिवसेना नेत्यांचे लागेबांधे असून वर्षाला 500 कोटींचा घोटाळा होत असल्याचा गंभीर आऱोप सोमय्यांनी केला आहे.
मुंबईत ३० टक्के पाणीकपात करायची आणि मुंबईकरांचे पिण्याचे पाणी टॅंकरद्वारे बिल्डरांना देण्याचं काम सुरु असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
या संपूर्ण प्रकरणावर तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने महापालिका आयुक्तांची भेट घेतल्याचंही सोमय्यांनी म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement