एक्स्प्लोर

कमला मिल अग्नितांडव : मालकांविरोधात हायकोर्टात विविध याचिका दाखल

सध्या मुंबई उच्च न्यायालयाचं सुट्टीकालीन खंडपीठ कार्यरत असल्याने या याचिकांवर 4 जानेवारी रोजी नियमित खंडपीठापुढे सुनावणी होण्याची शक्यता आहे.

मुंबई : कमला मिलमधील ट्रेडहाउस येथील 'वन अबव्ह' आणि 'मोजोस ब्रिस्टो' पबमध्ये लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. याप्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयात विविध याचिका दाखल झाल्यात. तर दुसरीकडे बीएमसीने कमला मिल कंपाऊंडमध्ये सुरू केलेल्या कारवाईविरोधात हायकोर्टात दाद मागणाऱ्या 'स्मॅश' या स्पोर्ट्स बारला दिलासा देण्यासही हायकोर्टाने स्पष्ट नकार दिलाय. कमला मिलमध्ये लागलेल्या आगीची सीबीआय चौकशी व्हावी या मागणीसाठी 18 वर्षीय गर्व सूद नावाच्या विधी शाखेच्या विद्यार्थ्याने एक जनहित याचिका हायकोर्टात दाखल केलीय. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांच्यावतीनेही यासंदर्भात एक याचिका सादर करण्यात आलीय. सध्या मुंबई उच्च न्यायालयाचं सुट्टीकालीन खंडपीठ कार्यरत असल्याने या याचिकांवर 4 जानेवारी रोजी नियमित खंडपीठापुढे सुनावणी होण्याची शक्यता आहे. या याचिकांमध्ये पब मालक आणि चालक यांच्या तसेच मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करण्यात आलाय. या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला, तर 55 जण गंभीर जखमी झाले. त्यामुळे या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या सर्वांवर आणि पालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवरसुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी, अशी मागणी भालेकर यांच्या याचिकेमध्ये करण्यात आलीय. तसेच मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 50 लाख रुपये आणि जखमींना 10 लाख रुपयांची मदत प्रशासनाने द्यावी अशी मागणीही करण्यात आली आहे. स्मॅश एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत लोअर परेल येथील कमला मिल कंपाऊंडमध्ये एक स्पोट्सबार, पार्टी हॉल आणि एक गो कर्टिंग ट्रैकही उभारण्यात आलाय. ही सर्व बांधकाम पालिकेने संमत केलेल्या आराखड्याप्रमाणे असल्याने त्याविरोधात करवाई करत येणार नाही, असा दावा या कंपनीनं केलाय. मात्र महापालिकेने परवानगी देताना तिथे गो कार्टिंग ट्रॅक उभारण्याची परवानगी दिलेली नाही, असं नमूद करत तूर्तास 'स्मॅशला' कोणताही दिलासा नकार देत या याचिकेवरील सुनावणी 8 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
Embed widget