एक्स्प्लोर

कल्याणमधील प्रसिद्ध बिल्डर संजय गायकवाड यांच्याविरोधात वीजचोरीचा गुन्हा दाखल

कल्याणमधील प्रसिद्ध बिल्डर संजय गायकवाड यांच्याविरोधात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याप्रकरणी संजय गायकवाड यांनी मात्र हे बदनामीचे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे.

कल्याण : कल्याणमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय गायकवाड हे काही दिवसांपूर्वी 8 कोटी रुपये किमतीची रोल्स रॉईस कार विकत घेतल्यामुळे चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत, ते त्यांच्या विरोधात वीज चोरीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे. कल्याण पूर्व येथील एका इमारतीमध्ये वीज चोरीचा आरोप करत महावितरणाने त्यांच्या विरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. जवळपास 34 हजार 640 रुपयांची वीज चोरी झाल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. महावितरणाकडून गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर गायकवाड यांनी सदर रक्कम भरली असल्याचं महावितरणाकडून सांगण्यात आलं आहे. तर याप्रकरणी संजय गायकवाड यांनी मात्र हे बदनामीचे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी बोलताना माझ्यावर लावण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत. जर वीजचोरी झाली असेल, तर मग मीटर का नेलं नाही? असा संजय गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.

संजय गायकवाड यांनी बोलताना सांगितलं की, "वीजचोरी नसून तडजोडीचं बिल होतं, मीटरचा एक फेज जळाल्यानं महावितरणचे अधिकरी साईड व्हिजिट करण्यास आले होते. मीटरचा एक फेज बायपास असल्याचं त्यांचा निदर्शनास आलं, म्हणून महावितरणकडून तडजोडीचं बिल आकारण्यात आलं. परंतु, बिल आम्हाला मिळालं नव्हतं, माझी नाहक बदनामी केल्याप्रकरणी महावितरणाविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे."

काय आहे प्रकार? 

महावितरणाच्या भरारी पथकानं कल्याण पूर्व विभागातील कोळसेवाडी, आमराई तिसगाव भागात बांधकामाच्या ठिकाणी तपासणी केली असता वीजमीटर टाळून विजेचा चोरटा वापर सुरु असल्याचे आढळून आले. मार्चमध्ये ही तपासणी करण्यात आली होती. रीतसर पंचनामा करून चोरीच्या विजेचे 34 हजार 840 रुपयांचे देयक आणि 15 हजार रुपयांची तडजोड रक्कम भरण्याबाबत वीज वापरणाऱ्या संजय गायकवाड यांना कळवण्यात आले. मात्र पुरेसा कालावधी देऊनही वीजचोरीचे देयक आणि तडजोडीची रक्कम न भरल्याने महावितरणाने संजय गायकवाड यांच्याविरोधात कल्याण येथील महात्मा फुले पोलीस ठाण्यात वीजचोरीची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, गायकवाड यांच्याविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर गायकवाड यांनी वीजचोरीचे 34 हजार 840 रुपयांचे देयक आणि तडजोडीची 15 हजार रुपयांची रक्कम सोमवारी महावितरणकडे भरली असल्याची माहिती मिळत आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
Sanjay Raut and Devendra Fadnavis: 'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Maharashtra Weather: राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Embed widget