एक्स्प्लोर

भरधाव एक्सप्रेस आली अन् तेवढ्यात...; पोलिसांच्या धाडसामुळं जीव द्यायला निघालेल्या युवकाचे प्राण वाचले

Kalyan News : कल्याणमधील विठ्ठलवाडी स्थानकातून मुंबईकडे जाणाऱ्या मेल समोर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 18 वर्षीय युवकाचा पोलीस नाईक ऋषिकेश माने यांनी वाचवला जीव.

Kalyan News : विठ्ठलवाडी स्थानकातून मुंबईकडे जाणाऱ्या मेल समोर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 18 वर्षीय युवकाचा पोलीस नाईक ऋषिकेश माने यांच्या धाडसामुळे जीव वाचल्याची घटना घडली. बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. स्वत: च्या जीवाची पर्वा न करता या तरुणाच्या मागोमाग ट्रॅकमध्ये उडी मारून त्याला ट्रकच्या बाहेर ढकलत त्यांनी त्याचा जीव वाचवला. क्षणार्धात घडलेल्या या घटनेनंतर त्यांच्या या धाडसाचं सर्वत्र कौतूक होत आहे.

उल्हासनगर 5 मधील प्रेमनगर टेकडी परिसरात राहणारा कुमार पुजारी हा 18 वर्षीय तरुण काल (बुधवारी) दुपारी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाच्या फलाटावर होता. मात्र या फलाटावर ड्युटीवर असलेल्या माने यांना संशय आल्यानं ते त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मदुराई एक्स्प्रेस विठ्ठलवाडी स्थानकात दाखल होत होती. त्यावेळी गाडीचा वेग जास्त असतानाही कुमार यानं आत्महत्या करण्याच्या उद्देशानं चालत्या गाडीसमोर उडी मारली. मात्र त्याच्याच मागे असलेल्या माने यांना क्षणार्धात काय घडणार याची कल्पना आल्यानं त्यांनी स्वतः च्या जीवाची पर्वा न करता त्याच्या मागोमाग ट्रॅकवर उडी मारली. क्षणार्धात त्याला पुढच्या ट्रॅकवर ढकलत स्वतः ट्रॅकबाहेर झोकून दिलं. इतक्यात वेगाने मेल धडधडत निघून गेली. 

डोळ्याच्या पापण्यांची उघडझाप होत नाही, तोवर घडलेल्या घटनेनं प्रवाशांसह सर्वांचा श्वास रोखला गेला होता. मात्र मेल निघून गेल्यानंतर या युवकासह माने यांना सुखरुप पाहून सर्वांचा जीव भांड्यात पडला. पोलिसांनी या युवकाला कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात आणून त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावलं आहे. या तरुणाचं पोलिसांनी समुपदेशन केलं. तर तरुणाचे प्राण वाचवणाऱ्या माने यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये? स्थानिकांच्या दाव्याने खळबळ, पोलिसांकडून कसून शोध
मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये? स्थानिकांच्या दाव्याने खळबळ, पोलिसांकडून कसून शोध
कोल्हापूर जिल्ह्यात 10 पैकी 10 आमदार महायुतीचे असूनही अर्थसंकल्पात भोपळा, पण साखरसम्राटांच्या कारखान्यांसाठी 'पेटारा' उघडला!
कोल्हापूर जिल्ह्यात 10 पैकी 10 आमदार महायुतीचे असूनही अर्थसंकल्पात भोपळा, पण साखरसम्राटांच्या कारखान्यांसाठी 'पेटारा' उघडला!
जीवाचा प्रश्न म्हणत भाजप आमदाराची बनावट पनीर घेत थेट विधीमंडळात एन्ट्री, 'लक्षवेधी'तून ठेवणार अन्न व औषध प्रशासनाच्या कारभारावर बोट
जीवाचा प्रश्न म्हणत भाजप आमदाराची बनावट पनीर घेत थेट विधीमंडळात एन्ट्री, 'लक्षवेधी'तून ठेवणार अन्न व औषध प्रशासनाच्या कारभारावर बोट
Ajit Pawar : महाराष्ट्राला सहन होणार नाहीत अशी वक्तव्ये दोन्हीकडून होत आहेत ते परवडणार नाही; अजितदादांकडून वाचाळांना कानपिचक्या
महाराष्ट्राला सहन होणार नाहीत अशी वक्तव्ये दोन्हीकडून होत आहेत ते परवडणार नाही; अजितदादांकडून वाचाळांना कानपिचक्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Satish Bhosale Arrested: Suresh Dhasयांचा गुंड कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून अटकPankaja Munde On Suresh Dhas : पक्षश्रेष्ठींनी आमदार धस यांना समज द्यावी : पंकजा मुंडेAjit Pawar Tribute Yashwantrao Chavan : अजित पवारांची प्रितीसंगमावर यशवंतराव चव्हाणांना आदरांजलीAjit Pawar PC Pritisangam : सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असावा याची शिकवणी चव्हाण साहेबांनी दिली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये? स्थानिकांच्या दाव्याने खळबळ, पोलिसांकडून कसून शोध
मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये? स्थानिकांच्या दाव्याने खळबळ, पोलिसांकडून कसून शोध
कोल्हापूर जिल्ह्यात 10 पैकी 10 आमदार महायुतीचे असूनही अर्थसंकल्पात भोपळा, पण साखरसम्राटांच्या कारखान्यांसाठी 'पेटारा' उघडला!
कोल्हापूर जिल्ह्यात 10 पैकी 10 आमदार महायुतीचे असूनही अर्थसंकल्पात भोपळा, पण साखरसम्राटांच्या कारखान्यांसाठी 'पेटारा' उघडला!
जीवाचा प्रश्न म्हणत भाजप आमदाराची बनावट पनीर घेत थेट विधीमंडळात एन्ट्री, 'लक्षवेधी'तून ठेवणार अन्न व औषध प्रशासनाच्या कारभारावर बोट
जीवाचा प्रश्न म्हणत भाजप आमदाराची बनावट पनीर घेत थेट विधीमंडळात एन्ट्री, 'लक्षवेधी'तून ठेवणार अन्न व औषध प्रशासनाच्या कारभारावर बोट
Ajit Pawar : महाराष्ट्राला सहन होणार नाहीत अशी वक्तव्ये दोन्हीकडून होत आहेत ते परवडणार नाही; अजितदादांकडून वाचाळांना कानपिचक्या
महाराष्ट्राला सहन होणार नाहीत अशी वक्तव्ये दोन्हीकडून होत आहेत ते परवडणार नाही; अजितदादांकडून वाचाळांना कानपिचक्या
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडने उज्ज्वल निकमांसमोर वकीलांची फौज उभी केली, सुनावणीच्या पहिल्याच दिवशी मोठा निर्णय!
वाल्मिक कराडने उज्ज्वल निकमांसमोर वकीलांची फौज उभी केली, सुनावणीच्या पहिल्याच दिवशी मोठा निर्णय!
रितेशनं प्रीती झिंटाचा हात हातात घेतला अन् किस केलं; जिनेलियाचे हावभाव टिपणारा VIDEO व्हायरल, म्हणाली...
रितेशनं प्रीती झिंटाचा हात हातात घेतला अन् किस केलं; जिनेलियाचे हावभाव टिपणारा VIDEO व्हायरल, म्हणाली...
Donald Trump on India : डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, टॅक्स कमी करण्यासाठी भारताची सहमती, आता भारताकडून तत्काळ खुलासा
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, टॅक्स कमी करण्यासाठी भारताची सहमती, आता भारताकडून तत्काळ खुलासा
Kanifnath Yatra : कानिफनाथ यात्रेत मुस्लीम व्यापाऱ्यांना व्यवसाय करता येणार; मढी ग्रामसभेच्या 'त्या' ठरावाला न्यायालयाची स्थगिती
कानिफनाथ यात्रेत मुस्लीम व्यापाऱ्यांना व्यवसाय करता येणार; मढी ग्रामसभेच्या 'त्या' ठरावाला न्यायालयाची स्थगिती
Embed widget