एक्स्प्लोर
Advertisement
जेपी नड्डा यांना 'बिहारी' सांगण्यामागे मोदींची रणनीती
भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष जेपी नड्डा यांना पंतप्रधान मोदी यांनी बिहारी सांगण्यामागे मोठा अर्थ दडला आहे. कारण, यावर्षीच्या अखेरीस बिहारची निवडणूक आहे. ही निवडणूक जिंकणं भाजपसाठी महत्वाचे आहे.
मुंबई : भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासमोर बिहार निवडणुकीचं आव्हान असणार आहे. याची रणनीती आखण्याची तयारी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केलीय. अध्यपदाची सुत्रं हाती घेतल्यानंतर मोदी यांनी एका वक्तव्याद्वारे याचे संकेत दिलेत. जेपी नड्डा अध्यक्ष झाल्याने हिमाचल प्रदेशचे नागरिक आनंदी असतील, मात्र त्यांच्यापेक्षाही जास्त आनंद बिहारच्या नागरिकांना होणार आहे. कारण, नड्डा यांचं शिक्षण पटनात झालं असल्याचं मोदी म्हणाले.
जगत प्रकाश नड्डा यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेली माहिती सत्य आहे. मात्र, ही माहिती सांगण्यासाठी मोदींनी साधलेली वेळ आणि ठिकाण याला फार महत्व आहे. या वर्षीच्या अखेरीस बिहार विधानसभा निवडणुका होत आहेत. दिल्लीतील विधानसभा निवडणुकांत दाळ शिजणार नाही, याची कल्पना भाजपला आल्यानेच भाजपने आता बिहारकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळेच मोदींनी नड्डा यांच्या बिहार कनेक्शनचा उल्लेख केला. भाजपचे नवे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांचा जन्म 2 डिसेंबर 1960 ला पटनामध्ये झाला आहे. येथील सेंट जेवियर स्कूलमध्ये त्यांचं दहावीपर्यंतचे शिक्षण झालं. तर, पटना विद्यापीठातून त्यांनी बीएमध्ये पदवी घेतली. नंतर नड्डा कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी शिमल्याला आले. तिथेच एबीवीपीच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
मोदींच्या वक्तव्यामागे मोठा अर्थ -
भाजपचे माजी अध्यक्ष गृहमंत्री अमित शाह यांनी याआधीच बिहारची निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वात लढणार असल्याची घोषणा केली आहे. मागच्याच आठवड्यात वैशाली येथे झालेल्या एका कार्यक्रमात याचा पुनरउच्चार करण्यात आला. भाजप आणि जेडीयूमधील काही नेत्यांना निवडणूक सोबत लढू नये असं वाटतंय. मात्र, निवडणूक सोबत लढवण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने तयारी केली आहे. नड्डा यांना बिहारी सांगण्यामागे मोदींची मोठी योजना आहे. बिहारची निवडणूक जिंकणे भाजपसाठी खूप महत्वाचे आहे. कारण, एकापाठोपाठ एक राज्य भाजपच्या हातातून निसटून जात आहेत. अशातच जेडीयूसोबत युती टिकवणं हेही भाजपसमोरील एक आव्हान आहे. दोन्ही पक्षातील नाराजी जगजाहीर आहे. याचमुळेच मोदींच्या मंत्रीमंडळातून जेडीयू बाहेर आहे.
बिहारसाठी भाजपची रणनीती -
जागांच्या वाटपावरुन आत्ताच भाजप आणि जेडीयूमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. दोन्ही पक्षातील नेते आपापले फॉर्मुले सांगत आहे. भाजप 50-50 च्या फॉर्मुल्यावर निवडणूक लढण्यासाठी तयारी करत आहे. तर, जेडीयू कुठल्याही परिस्थितीत भाजपपेक्षा जास्त जागांवर दावा सांगत आहे. नितीश कुमार यांचे सल्लागार 2010 चा फॉर्मुला योग्य असल्याचे सांगत आहे. त्यावेळी जेडीयू 140 जागांवर लढली होती. मात्र, त्यांच्या वाट्याला 103 च जागा आल्या होत्या. त्यावेळी लोक जन शक्ति पक्ष युतीतून बाहेर होता. मागील वर्षी लोकसभा निवडणुकीत 50-50 च्या फॉर्मुल्यावर दोन्ही पक्ष अडून बसले होते. जेडीयूकडून प्रशांत किशोर मोर्चेबांधणी करत आहेत. पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळवून देण्यासाठी ते वातावरण निर्मिती करत आहेत. त्यामुळेच मोदींनी नड्डा यांना पुढे केले आहे. ते पण त्यांना बिहारी सांगत. हिंदी भाषिक भागात प्रभाव असलेल्या भाजपकडून राजस्थान, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि झारखंड ही राज्य गेली आहेत. त्यामुळेच बिहार ताब्यात ठेवण्यासाठी भाजपने आता नवीन रणनीती आखायला चालू केली आहे.
BJP President | भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची आज निवडणूक, जे.पी. नड्डा यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement