एक्स्प्लोर
Advertisement
जे. पी. नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष
जे. पी. नड्डा यांच नाव आधीपासूनच जवळपास निश्चित झालं होतं. त्यांच्या नावाची केवळ औपचारिक घोषणा बाकी राहिली होती. पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा असलेल्या अमित शाह यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती.
मुंबई : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जगत प्रकाश नड्डा यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. भाजपाच्या राष्ट्रीय निवडणूक समितीचे प्रमुख राधामोहन सिंग यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. अमित शाह यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर भाजपाच्या अध्यक्षपदाची चर्चा सुरू झाली होती. मात्र, अमित शाह यांच्या मदतीसाठी कार्यकारी अध्यक्ष म्हणून जे.पी. नड्डा यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे ही निवड लांबणीवर पडली होती.
जे. पी. नड्डा यांच नाव आधीपासूनच जवळपास निश्चित झालं होतं. त्यांच्या नावाची केवळ औपचारिक घोषणा बाकी राहिली होती. पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा असलेल्या अमित शाह यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती.
जे. पी. नड्डा मोदी सरकारच्या काळात आरोग्य खात्याची धुरा सांभाळली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आयुष्मान भारत यशस्वी होण्यामध्ये नड्डा यांचे मोठे योगदान आहे. गेल्या आठ महिन्यांपासून नड्डा कार्यकारी अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत होते. आता नड्डा यांच्यावर जगातील सगळ्यात मोठ्या पक्षाची जबाबदारी आहे. BJP President | भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची आज निवडणूक, जे.पी. नड्डा यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार | ABP Majha जे. पी. नड्डा यांचा जन्म 2 डिसेंबर 1960 मध्ये पटनातील बिहार येथे झाला. नड्डा यांचे वडील नारायण लाल नड्डा पटना विश्वविद्यालयाचे प्राध्यापक आणि रांची विश्वविद्यालयाचे कुलगुरू होते. नड्डा यांनी सुरुवातीचे शिक्षण बिहार येथील स्नातक विश्वविद्यालयात पूर्ण केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अनेक विद्यार्थी आंदोलनात ते सहभागी झाले. 1975 सालच्या प्रकाश नारायण यांच्या आंदोलनात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.Jagat Prakash Nadda elected unopposed as the National President of Bharatiya Janata Party (BJP) pic.twitter.com/ek5PlEZ2sE
— ANI (@ANI) January 20, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement