एक्स्प्लोर

विनोद तावडे महेश ट्युटोरियलचे विद्यार्थी होते का? : जितेंद्र आव्हाड

‘घरगुती शिकवण्या घेणाऱ्यांना जीएसटी लागू करण्याचा मसुदा शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी तयार केला आहे. हा प्रकार म्हणजे मोठ्या महेश ट्युटोरियल किंवा तत्सम बड्या क्लासेसची, तावडे यांनी घेतलेली सुपारीच आहे.’ असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

मुंबई : ‘घरगुती शिकवण्या घेणाऱ्यांना जीएसटी लागू करण्याचा मसुदा शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी तयार केला आहे. हा प्रकार म्हणजे मोठ्या महेश ट्युटोरियल किंवा तत्सम बड्या क्लासेसची, तावडे यांनी घेतलेली सुपारीच आहे.’ असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. पालकांनी मुलांना मोठ्या कोचिंग क्लासेसमध्ये टाकण्यासाठी सरकारचा हा सगळा आटापिटा असल्याचा आरोपही आव्हाडांनी केला आहे. आमदार जितेंद्र आव्हाडांचा नेमका आरोप काय? समाजात पुन्हा विषमता आणायची आणि वर्णव्यवस्था प्रस्थापित करायची यासाठी भाजपा सरकार प्रत्येक प्रयत्न आहे. घरातल्या घरात शिकवण्या घेणाऱ्यांना सरकारकडे नोंदणी आवश्यक करणं, त्यांना ५% अधिभार, आयकर, जीएसटी लागू करण्याच्या प्रस्तावाचा मसुदा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी तयार केला आहे. विषमता आणि वर्णव्यवस्था आणायचा तो एक बिलंदर प्रयत्न आहे हे मी विनोदाने नाही तर अतिशय गंभीरपणे सांगतो. शालेय मुलांच्या घरबसल्या शिकवण्या घेणाऱ्यांमध्ये बहुसंख्य महिला आहेत. आपल्या शिक्षणाला साजेशी किंवा घराच्या जवळपास नोकरी मिळत नाही, अथवा बाळंतपणानंतर आपल्या मुलावर लक्ष केंद्रित करण्यासाठी नोकरी सोडलेल्या महिला यात प्रामुख्याने आहेत. त्यात अनेक उच्चशिक्षित आहेत. घरातच काम करुन संसाराला चार पैशांचा हातभार लागावा हा या महिलांचा हेतू असतो. निवृत्तीनंतर आयुष्यात अचानक रितेपणा येतो. किंवा पेन्शनमधे भागत नाही म्हणूनही अनेक स्त्रिया हा व्यवसाय करतात. शारीरिक अपंगत्वामुळे कधीच नोकरी न करु शकलेली, अविवाहित आणि आता वार्धक्याकडे झुकलेली एक महिला तर थेट माझ्या माहितीत आहे. कोण असतात त्यांचे विद्यार्थी? एखाद्या विषयात कच्ची असलेली, शाळेतल्या सुमार दर्जाच्या शिक्षणामुळे पालकांची चिंता बनलेली, कनिष्ठ किंवा मध्यमवर्गीय घरातली मुलं; ज्यांना महागड्या कोचिंग क्लासेसची फी परवडत नाही. चारदोन मुलांच्या शिकवण्या घेणाऱ्या या महिलांचं उत्पन्न लाखो रुपयांत नसतं. किंबहुना, हे एक ज्ञानदानाचं काम आहे. कराची कुऱ्हाड आता त्यांच्यावरही घालायला सरकार निघालं आहे. सावित्रीबाई फुले यांच्या वारशावर आजही केली जात असलेली ही चिखलफेक आहे. या छोट्या, सुटसुटीत आणि परवडणाऱ्या शिकवण्या कराच्या ओझ्याखाली बंद पडल्या की तिथल्या मुलांचे हतबल पालक अर्थातच पोटाला आणखी चिमटा काढून त्यांना नाईलाजाने बड्या कोचिंग क्लासमध्ये टाकणार. महेश ट्युटोरियल किंवा तत्सम बड्या क्लासेसची, तावडे यांनी घेतलेली ही सुपारी आहे, असा आरोप मी आज स्पष्टपणे करतो आहे. सरकारने गेल्या चार वर्षांत, केंद्रात आणि राज्यात, दरवर्षी शिक्षणावरचा खर्च सातत्याने कमी केला आहे. तावडे यांनी तर महाराष्ट्रातल्या १३०० शाळा "अपुरी विद्यार्थी संख्या" या कारणाखाली बंद केल्या. तिथली मुलं आज रोज चारपाच किलोमीटर पायपीट करत दूरच्या शाळेत जातात. काही दिवसांनी ती कंटाळून शिक्षण सोडतील. तिथला बजरंग दलाचा म्होरक्या मग त्यांना ताब्यात घेईल. तो सांगेल तेव्हा दंगे करणं इतकंच त्यांचं आयुष्य उरेल. जे त्याच्या तावडीतून वाचतील ते आहेतच शेतमजुरी, ड्रायव्हर, मेकॅनिक, वॉचमन अशी कामं करायला. थोडक्यात, हलकी कामं करणारा एक स्तर समाजात कायम राहील आणि त्यासाठी त्याला शिक्षणापासून वंचित ठेवलं पाहिजे, याची नीट काळजी सरकार घेत आहे. राहिला प्रश्न शिकवण्या घेणाऱ्या महिलांचा. मनुस्मृतीत त्यांना कायमच दुय्यम स्थान आहे. किंबहुना स्थानच नाही. तीच मनुस्मृती मागच्या दाराने हे लोक आणू पाहात आहेत. कन्हैया कुमारने छान सांगितलं. जीएसटी आणताना, एक देश - एक कर, असं सरकार म्हणालं होतं. तर मग, एक देश - एक शिक्षण, असं धोरण का नाही? कारण त्यामुळे विषमता नष्ट होईल आणि ते मनुवाद्यांच्या अजेंड्यात बसत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Sahil Wakode Death Case: 'चूक मान्य, मला एक संधी द्या, माफ करा...', आयआयटी बॉम्बे कॉपीप्रकरणातील साहिल लेखी निवेदनात काय-काय म्हणाला? नवी माहिती समोर, तपासाला नवं वळण
'चूक मान्य, मला एक संधी द्या, माफ करा...' आयआयटी बॉम्बे कॉपीप्रकरणातील साहिल लेखी निवेदनात काय-काय म्हणाला? नवी माहिती समोर, तपासाला नवं वळण
Tukaram Mundhe : लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
Abhijeet Dipke Post Sonakshi Sinha Comment: अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Sara Tendulkar birthday: सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
Nagpur Crime : आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
Nagpur BJP: मुख्यमंत्री फडणवीसांची शिष्टाई फळाला, नागपूर भाजपातील बंड शमवण्यात यश; बंडखोर अनिल सोलेंची तलवार मान्य, व्यास यांचाही राजीनामा मागे, नेमकं काय काय घडलं?
मुख्यमंत्री फडणवीसांची शिष्टाई फळाला, नागपूर भाजपातील बंड शमवण्यात यश; बंडखोर अनिल सोलेंची तलवार मान्य, व्यास यांचाही राजीनामा मागे, नेमकं काय काय घडलं?
Shani Dev: अशी ओळखा तुमच्यावरील शनिदेवांची कृपा, 7 अद्भूत संकेत! जीवनातील 'हे' बदल कमी लोकांना माहित, ज्योतिषशास्त्र..
अशी ओळखा तुमच्यावरील शनिदेवांची कृपा, 7 अद्भूत संकेत! जीवनातील 'हे' बदल कमी लोकांना माहित, ज्योतिषशास्त्र..
Inflation Essential Commodities: 42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?
42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?
Embed widget