एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
3 फूट उंची, 53 वय वर्षे... मनसेचे जयंत दांडेकर मुंबई महापालिकेच्या रणांगणात
मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं भवितव्य काय असेल, हे येणार काळ स्पष्ट करेलच. मात्र, सध्या विक्रोळीमध्ये मनसेच्या एका उमेदवाराची भारी चर्चा रंगली आहे. जयंत दांडेकर असं या उमेदवाराचं नाव नाव आहे.
जयंत दांडेकर म्हणजे ‘मूर्ती लहान पण किर्ती महान’ सार्थ ठरवणारे आहेत. आपल्या उंचीचा कोणताही न्यूनगंड मनात न बाळगता सार्वजनिक जीवनात यशस्वी वाटचाल करणाऱ्या दांडेकर हे मुंबईतील विक्रोळीच्या कन्नमवार नगरमधून मनसेचे उमेदवार आहेत.
मनसेने मुंबई महापालिकेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आणि विक्रोळीच्या कन्नमवार नगरमधून जयंत दांडेकर यांना तिकीट मिळालं. मग विशेष काय? तर विशेष आहे. कारण जयंत दांडेकर हे थोडे हटके व्यक्तिमत्व आहेत.
‘मि. डिपेंडेबल’ म्हणून प्रसिद्ध असलेले असलेले 53 वर्षीय जयंत दांडेकर न थकता कधीही कन्नमवार नगरमधील नागरिकांच्या मदतीसाठी धावून जातात.
उंचीने 3 फूट असलो तरी त्यात कसलाही न्यूनगंड न मानता अत्यंत निष्ठेने आपलं समाजकार्याचं काम करत राहायचं, असे जयंत दांडेकरांचे विचार आहेत. त्यामुळे न थकता ते स्थनिकांना अर्ध्या रात्रीतून मदत करायला धावतात.
“माझी उंची माझ्या कामातून मोजा आणि माझी हीच उंची समाजात माझी ओळख आहे”, असं दांडेकर यांचं म्हणणं आहे. विक्रोळीमध्ये इतर अनेक उमेदवार असताना एका सच्चा समाजसेवकाला मनसेने तिकीट दिल्याचं स्थनिकांच्या भावना आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
गडचिरोली
राजकारण
निवडणूक
क्रीडा
Advertisement