एक्स्प्लोर
Advertisement
भुजबळांना व्हीआयपी ट्रीटमेंट, तात्याराव लहाने दोषी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याबद्दल जे जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. मुंबईतील एमएलए कोर्टाने हा निर्णय दिला आहे.
छातीत दुखायला लागल्यानंतर छगन भुजबळ यांना जेजे रुग्णालयातून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. परंतु तात्याराव लहाने यांच्या शिफारशीमुळे छगन भुजबळांना व्हीआयपी ट्रीटमेंट केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.
याप्रकरणी त्यांनी पीएमएलए कोर्टात याचिका दाखल केली होती. तात्याराव लहानेंनी मात्र या प्रकरणातून हात झटकत आपला काहीही संबंध नसल्याचं सांगितलं. परंतु न्यायालयाला लहानेंचा दावा बसला नाही. दमानियांच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने त्यांना दोषी ठरवलं.
दरम्यान, तात्याराव लहाने यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पीएमएलए कोर्ट न्यायालयाच्या अवमानप्रकरणावर सुनावणी करु शकत नसल्याने, कारवाईसाठी हे प्रकरण उच्च न्यायालयात सोपवलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement