एक्स्प्लोर
इक्बालवर खंडणीप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल
मुंबईच्या जमिनीच्या व्यवहारात बिल्डरला धमकावून जमिनीच्या व्यवहारातून बाजूला काढून, ती जमीन दुसऱ्या बिल्डरला देण्याच्या माध्यस्थीबाबत घेतलेल्या 3 कोटींच्या खंडणी इक्बालने मागितली.
![इक्बालवर खंडणीप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल Iqbal Kaskar Booked For Extortion Of Rs 3 Crore In New Case Latest Updates इक्बालवर खंडणीप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/19145240/Iqbal-Kaskar-Pradeep-Sharma.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ठाणे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरवर आता खंडणी प्रकरणातील तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईतील जमिनीच्या व्यवहार प्रकरणी हा गुन्हा आहे.
मुंबईच्या जमिनीच्या व्यवहारात बिल्डरला धमकावून जमिनीच्या व्यवहारातून बाजूला काढून, ती जमीन दुसऱ्या बिल्डरला देण्याच्या माध्यस्थीबाबत घेतलेल्या 3 कोटींच्या खंडणी इक्बालने मागितली. या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा तिसरा गुन्हा दाखल झाल्याने इक्बाल कासकर याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाईसाठी आवश्यक प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत असल्याची पोलीस वर्तुळात सुरू आहे. गोराई भागातील 38 एकर जमिनीचा व्यवहार असला तरीही पोलिसांच्या अवहानाने हा गुन्हा ठाण्यात दाखल करण्यात आला आहे
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी इक्बाल कासकरला 13 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. इक्बालसोबत त्याच्या दोन साथीदारांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बीड
बीड
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)