एक्स्प्लोर

IPLची बस फोडल्यानंतर मनसेचं स्पष्टीकरण; म्हणाले, हक्क नाही मिळाला तर...

Mumbai MNS IPL Updates : IPLमधील खेळाडूंसाठी आणलेली बस मनसे कार्यकर्त्यांनी काल रात्री फोडली. आमच्या हक्कासाठी तोडफोड केली आणि जर हक्क नाही मिळाला तर पुढेही तोडफोड करु, असा इशारा मनसेनं दिला आहे.

Mumbai MNS IPL Updates :  मनसे वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत आयपीएलची बस फोडली आहे. खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचं काम मुंबईच्या व्यावसायिकांना न दिल्यानं मनसे आक्रमक झाली आहे. IPLमधील खेळाडूंसाठी आणलेली बस मनसे कार्यकर्त्यांनी काल रात्री फोडली असल्याची माहिती आहे. काल रात्री 11 ते 11.30 वाजेच्या सुमारास ताज हॉटेलसमोर ही घटना घडली असल्याची माहिती आहे. 

आयपीएल महाराष्ट्रामध्ये तर आयपीएलमध्ये वापरल्या जाणाऱ्या बसेस दिल्लीतून का?

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी म्हटलं की, आम्ही गुंडगिरी केली तुम्ही म्हणता पण का केली ते ही जाणून घ्या. आयपीएल महाराष्ट्रामध्ये तर आयपीएलमध्ये वापरल्या जाणाऱ्या बसेस दिल्लीतून का मागवताय. सरकार एका बाजूला म्हणत की आयपीएल महाराष्ट्रामध्ये आल्यामुळे अर्थ चक्राला गती मिळेल मग महाराष्ट्राच्या वाहतूदारांना यातून वंचित का ठेवलं जात आहे, असा सवाल नाईकांनी केला आहे. 

नाईक म्हणाले की, दिल्लीतील बसेस वर टॅक्स नाही म्हणून ते स्वस्त दरात बसेस उपलब्ध करुन देतात. आज महाराष्ट्र मध्ये प्रत्येक बसला 3 लाख रुपये टॅक्स द्यावा लागतो म्हणून दर जास्त असतात.  यात सरकारने मध्यस्ती केली पाहिजे, पण ते होत नाही. म्हणून आमच्या हक्कासाठी तोडफोड केली आणि जर हक्क नाही मिळाला तर पुढेही तोडफोड करु, असा इशारा नाईकांनी दिला आहे.

मनसेच्या वाहतूक सेनेचा आक्रमक पवित्रा  

आयपीएल खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचे काम मुंबईतील स्थानिक व्यावसायिकांना न दिल्याने मनसेच्या वाहतूक सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यामुळंच वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंसाठी आलेली बस काल रात्री फोडली आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यातील वाहतूक व्यवसाय हा महाराष्ट्रातील व्यावसायिकांना डावलून बाहेरच्यांच्या घशात घालायचा प्रयत्न सुरू होता. आयपीएल व्यवस्थापन आणि सरकार दरबारी विनंती करूनही काही बदल झाला नाही. त्यामुळे मनसेने हा दणका दिला आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी दिली आहे.

आयपीएलचा 15 हंगाम येत्या 26 मार्चपासून सुरु

आयपीएलचा 15 हंगाम येत्या 26 मार्चपासून सुरु होणार आहे. तर, अंतिम सामना 29 मे रोजी खेळला जाणार आहे. या हंगामातील पहिला सामना चेन्नई- कोलकाता यांच्यात रंगणार आहे.  हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मुंबईत वानखेडे, ब्रेबॉर्न तर नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर सामने खेळवले जाणार आहेत. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

इतर महत्त्वाच्या बातम्या: 

TATA IPL 2022: तब्बल 8 संघाकडून खेळला 'हा' खेळाडू, मेगा ऑक्शनमध्ये ठरला अनसोल्ड; अखेर कोलकात्यानं घेतलं विकत, चेन्नईविरुद्ध रचणार इतिहास

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 10 Jan 2025 : ABP MajhaAmol Kolhe on Shiv Sena UBT Congress : अमोल कोल्हेंची ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसवर जोरदार टीकाMaharashtra MVA : जागावाटप आणि वादाचं अटक मटक; वडेट्टीवार-राऊत आमनेसामनेABP Majha Headlines : 06 PM : 10 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
Embed widget