एक्स्प्लोर

फक्त एक क्लिक अन् मिळवा तुमच्या इमारतीची सर्व माहिती; मुंबई महापालिकेचा नवा प्रकल्प

Mumbai News Updates : मुंबईकरांना लवकरच फक्त एका क्लिकवर आपल्या इमारतीला महानगरपालिकेकडून प्राप्त विविध परवानग्या, सेवा-सुविधांची माहिती मिळणार आहे.

Mumbai News : मुंबईकरांना (Mumbai News Updates) लवकरच एका क्लिकवर आपल्या इमारतीसाठी लागणाऱ्या मनपाच्या विविध परवानग्या, सेवा-सुविधांची माहिती, मिळवता येणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेतर्फे नवी प्रणाली सुरु करण्यात आली आहे. 'इमारत ओळख क्रमांक' अर्थात 'मायबीएमसी बिल्डिंग आयडी' (MyBMC ID) प्रकल्प सुरु करण्यात आला. मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आश्विनी भिडे यांनी या प्रणालीचा शुभारंभ केला. इमारतींना दिलेल्या वेगवेगळ्या परवानग्या आणि सुविधांच्या ऑनलाईन संगणकीय प्रणाली एकाच मुख्य क्रमांकाखाली जोडण्याचं काम या प्रकल्पात पालिकेकडून करण्यात येणार आहे. 

'मायबीएमसी बिल्डिंग आयडी' या प्रणालीत टप्प्याटप्प्यानं एकूण 12 विभागांची माहिती जोडली जाणार आहे. इमारतीसाठी महानगरपालिकेने दिलेल्या विविध परवानग्या, सेवांचे वेगवेगळे संदर्भ क्रमांक या प्रणालीद्वारे एकाच मुख्य क्रमांकाखाली जोडण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रशासकीय कार्यवाही सुरु झाली आहे. ही प्रणाली फक्त ऑनलाईन जोडणीपुरती नसून, त्यातून प्रशासनाला महसुलवाढ, पारदर्शकता आणि प्रशासकीय कामांमध्ये वेग हे महत्त्वाचे फायदे साध्य होतील. तर मुंबईकरांना देखील वेगवेगळ्या परवानग्यांची अद्ययावत, विश्वासार्ह माहिती मिळेल. त्यामुळे सर्व संबंधित विभागांनी कालबद्ध कार्यक्रम आखून आपल्या स्तरावरील माहिती जोडणीची कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश अतिरिक्त पालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिली आहे. 

पहिल्या टप्प्यात दुकानं आस्थापना, व्यापार/आरोग्य परवानग्या, करनिर्धारण, जल जोडणी यांच्या ऑनलाईन प्रणाली एकत्रित होणार आहे. पालिकेच्या माहिती तंत्रज्ञान खात्यानं कोणताही कंत्राटदार किंवा सल्लागार न नेमता, अंतर्गत यंत्रणेच्या मदतीने आणि उपलब्ध भागधारकांच्या सहकार्याने हा प्रकल्प हाती घेतला आहे. एवढंच नाहीतर मुंबईकरांसाठी महानगरपालिका संकेतस्थळासह मायबीएमसी मोबाईल ऍपवरुन देखील लवकरच ही प्रणाली उपलब्ध होणार आहे. आता या प्रणालीमुळे विविध परवानगी अर्ज, नूतनीकरण, देयकांचा भरणा करणे देखील शक्य होणार आहे. अद्ययावत (रियल टाईम) माहिती उपलब्ध होऊन कामकाजातील पारदर्शकता आणखी वाढणार आहे. 

पालिकेनं मुंबईतील प्रत्येक इमारतीला स्वतंत्र ओळख क्रमांक देण्याची कार्यवाही काही वर्षांपूर्वीच सुरू केली आहे. मुंबईत सुमारे दोन लाख 33 हजार मालमत्ता करपात्र इमारती आहेत. करसंकलनाच्या दृष्टीने यातील प्रत्येक इमारतीला 15 अंकी क्रमांक देण्यात आला आहे. हा प्रकल्प राबवत असताना, प्रशासनाच्या निदर्शनास आलं की, ज्याप्रमाणे मालमत्ता कर संकलनासाठी संदर्भ क्रमांक दिला आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक इमारतीला मिळणाऱ्या इतर परवानग्या आणि सेवा-सुविधांचे संदर्भ क्रमांक देखील एकमेकांशी जोडणे शक्य आहे. या विचारातूनच प्रत्येक इमारतीला एकच मुख्य ओळख क्रमांक देण्याचा निर्णय घेण्यात आला.

नव्या प्रणालीमुळे मुंबईकरांना होणारे फायदे :

  • सदर प्रणालीची माहिती अद्ययावत व रियल टाईम आणि विश्वासार्ह असेल.
  • घर/ इमारत मालक, गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन यांना या माहितीमुळे इमारती संदर्भातील कामकाजात सहजता येईल.
  • व्यापार संकूल/ दुकाने/ सिनेमागृह/ उपहारगृह यामधील नागरी सेवा-सुविधांचा लाभ घेताना अशा इमारती/ दुकाने यांची सुरक्षा व कायदेशीर परवानग्या याबाबतची माहिती सहजपणे उपलब्ध होईल.
  • व्यापार/ व्यावसायिकांना त्यांच्या वैध परवानग्या प्रदर्शित करुन व्यवसाय वाढविण्याची संधी उपलब्ध होईल.
  • नागरिक/ व्यावसायिक त्यांच्या जागा वापराबाबत आवश्यक त्या परवानग्या प्राप्त करण्याकरिता प्रोत्साहित होतील.
  • घर/दुकाने खरेदीचा व्यवहार करताना बांधकाच्या अधिकृततेबाबतची माहिती सहज उपलब्ध होईल.
  • विविध खात्यांची माहिती एकत्रित उपलब्ध झाल्याने, एखादी परवानगी घेताना/देताना अन्य खात्यांचे अभिप्राय प्राप्त करण्यासाठीचा प्रशासकीय कामकाजातील वेळ वाचेल.
  • परिणामी प्रशासकीय कार्यवाही गतिमान होईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani : Shahapur Rain Updates : शहापूरमध्ये पावसाचं रौद्ररुप, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Embed widget