एक्स्प्लोर

Indrani Mukerjea : जिथे जाणार तो पत्ता, दूतावासात हजेरी अन् दोन लाखांची अनामत; परदेशात जाण्यासाठी इंद्राणी मुखर्जीसमोर कोणत्या अटी? 

Sheena Bora Murder Case : शीना बोरा हत्याकांडातील आरोपी असलेली इंद्राणी मुखर्जीला जामीन मिळाल्यानंतर आता परदेशात जाण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. 

मुंबई : शीना बोरा हत्याकांडातील (Sheena Bora Murder Case)  मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला (Indrani Mukerjea) दिलासा मिळाला आहे. इंद्राणी मुखर्जीला परदेशात जाण्यास मुंबई सत्र न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. जामिनावर बाहेर पडल्यानंतर इंद्राणीला पहिल्यांदाच देशाबाहेर जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यांत एकदाच 10 दिवसांकरता स्पेन आणि इंग्लंडमध्ये जाण्यास परवानगी देण्यात आली असून त्यासाठी दोन लाख रूपये अनामत रक्कम तसेच दोन नातेवाईकांना हमीदार बनवण्याचे निर्देश सत्र न्यायालयाने दिले आहेत. 

परदेशात इंद्राणी मुखर्जी जिथं राहणार आहे तिथला संपूर्ण पत्ता आणि लँडलाईन नंबर सीबीआयला देणं बंधनकारक आहे. याशिवाय परदेशातील वास्तव्यादरम्यान तिथल्या भारतीय दूतावासात एकदा हजेरी लावणं बंधनकारक आहे. ती हजेरी लावल्याचं प्रमाणपत्र भारतात परत आल्यावर कोर्टात सादर करावं लागणार. 

याशिवाय परदेशात असताना कोणतंही गैरकृत्य अथवा इतक कोणत्याही विवादात अडकून देशाचं नाव खराब होईल असं काम न करण्याची सक्त ताकीद मुंबई सत्र न्यायालयाने दिली आहे. इंद्राणी परदेशात असताना तिचे वकील या नात्यानं रणजित सांगळे यांना मुंबईत गरज पडल्यास उपलब्ध राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

काय आहे शीना बोरा हत्या प्रकरण?

शीना बोरा (वय 24) हिची एप्रिल 2012 साली हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण 2015 साली उजेडात आले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, शीनाची आई इंद्राजी मुखर्जी या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी आहे. अनेक महिने ते तुरुंगात होती. मात्र, सध्या इंद्राणी मुखर्जीला जामिनावर बाहेर सोडण्यात आले आहे.

इंद्राणीचा चालक शामवर रायला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याने दिलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारे इंद्राणी मुखर्जीला साल 2015 मध्ये अटक करण्यात आली. इंद्राणीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि शामवर राय यांनी मिळून पहिल्या पतीपासूनची मुलगी शीनाची हत्या केली आणि त्यांच्याच मदतीनं 25 एप्रिल 2012 रोजी तिच्या मृतदेहाची विल्टेवाट लावण्यात आल्याचा आरोप आहे. 2015 मध्ये अखेर हे प्रकरण उघडकीस आले होते. 

इंद्राणीने मुंबईतील वांद्रे येथे शीनाची गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रायगड जिल्ह्यातील पेण परिसरातील गागोदे गाव गाठल्याचं सांगण्यात येतंय. या गावाच्या परिसरात शीनाचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर पोलिसांनी इंद्राणीसोबत तिचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्नालाही हत्या आणि पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. सीबीआयने कटात सहभागी असल्याने पीटर मुखर्जीलाही अटक केली होती. 2020 मध्ये त्याला जामीन देण्यात आला. खटला सुरु असतानाच पीटर मुखर्जी आणि इंद्राणीचा घटस्फोट झाला होता.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : तिकडे शरद पवार कोल्हापुरात, इकडे अजित पवारांची मोठी घोषणा; आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडिअम उभारणार
तिकडे शरद पवार कोल्हापुरात, इकडे अजित पवारांची मोठी घोषणा; आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडिअम उभारणार
धक्कादायक! पुण्यात 8 दिवसांपूर्वी मुलाची आत्महत्या, आई-वडिलांनीही संपवले जीवन; अख्ख कुटुंब संपलं
धक्कादायक! पुण्यात 8 दिवसांपूर्वी मुलाची आत्महत्या, आई-वडिलांनीही संपवले जीवन; अख्ख कुटुंब संपलं
पुतळा पार्कचा 'बार्शी पॅटर्न'; महापुरुषांचे पुतळे एकाच जागेत, आर.आर. पाटलांकडून विशेष मंजुरी
पुतळा पार्कचा 'बार्शी पॅटर्न'; महापुरुषांचे पुतळे एकाच जागेत, आर.आर. पाटलांकडून विशेष मंजुरी
बिबट्या पळाला, त्याच्यामागे गेंडाही पळाला; जानकरांचा कागलमध्ये जाऊन हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
बिबट्या पळाला, त्याच्यामागे गेंडाही पळाला; जानकरांचा कागलमध्ये जाऊन हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bishnoi Gang Special Report : सलमानच्या 'जानी दुश्मन'चे शत्रू कोण?Jaydeep Apte Special Report : आरोपींना राजाश्रय? विरोधकांचा सवालSamarjeet Ghatge Special Report : शरद पवारांची पश्चिम महाराष्ट्रात मोठी खेळी !Marathwada Farming Special Report : मराठवाड्यात 16 हजार 225 हेक्टर बागायती शेतीचं नुकसान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : तिकडे शरद पवार कोल्हापुरात, इकडे अजित पवारांची मोठी घोषणा; आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडिअम उभारणार
तिकडे शरद पवार कोल्हापुरात, इकडे अजित पवारांची मोठी घोषणा; आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडिअम उभारणार
धक्कादायक! पुण्यात 8 दिवसांपूर्वी मुलाची आत्महत्या, आई-वडिलांनीही संपवले जीवन; अख्ख कुटुंब संपलं
धक्कादायक! पुण्यात 8 दिवसांपूर्वी मुलाची आत्महत्या, आई-वडिलांनीही संपवले जीवन; अख्ख कुटुंब संपलं
पुतळा पार्कचा 'बार्शी पॅटर्न'; महापुरुषांचे पुतळे एकाच जागेत, आर.आर. पाटलांकडून विशेष मंजुरी
पुतळा पार्कचा 'बार्शी पॅटर्न'; महापुरुषांचे पुतळे एकाच जागेत, आर.आर. पाटलांकडून विशेष मंजुरी
बिबट्या पळाला, त्याच्यामागे गेंडाही पळाला; जानकरांचा कागलमध्ये जाऊन हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
बिबट्या पळाला, त्याच्यामागे गेंडाही पळाला; जानकरांचा कागलमध्ये जाऊन हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
आजही गणपती घरात येतो तो मुलगाच घेतो; बाप्पांच्या आगमनापूर्वीच प्रणिती शिंदेंची खंत, महिलांना आवाहन
आजही गणपती घरात येतो तो मुलगाच घेतो; बाप्पांच्या आगमनापूर्वीच प्रणिती शिंदेंची खंत, महिलांना आवाहन
गणेशोत्सवात  7, 12 अन् 17 सप्टेंबरला मद्यविक्री बंद; जिल्हाधिकाऱ्यांची ऑर्डर, अन्यथा कारवाई
गणेशोत्सवात 7, 12 अन् 17 सप्टेंबरला मद्यविक्री बंद; जिल्हाधिकाऱ्यांची ऑर्डर, अन्यथा कारवाई
मोठी बातमी! वनराज आंदेकर खून प्रकरणात 13 जणांना अटक, ताम्हिणी घाटातून उचललं
मोठी बातमी! वनराज आंदेकर खून प्रकरणात 13 जणांना अटक, ताम्हिणी घाटातून उचललं
Health: रक्तातली शुगर 'एवढी' झाली तर चिंतेचं कारण, ही लक्षणं दिसताच व्हा सावधान
रक्तातली शुगर 'एवढी' झाली तर चिंतेचं कारण, ही लक्षणं दिसताच व्हा सावधान
Embed widget