एक्स्प्लोर
समुद्रात बोटीमध्ये अडकलेल्या चौघांची नौदलाकडून सुटका

मुंबई : भारतीय नौदलाच्या जवानांनी मुंबईत बोटीवर अडकलेल्या चौघांना वाचवलं. भारतीय नौदलाच्या 'सीकिंग सी' या हेलिकॉप्टरच्या मदतीने सगळ्यांची सुखरुप सुटका करण्यात आली.
समुद्रात सोनिका नावाच्या टग बोटीवर चार क्रू मेंबर अडकले होते. ओहोटी दरम्यान दगडात ही बोट अडकली आणि त्यात पाणी भरण्यास सुरुवात झाली. ज्या ठिकाणी ही बोट अडकली तिथे शिवस्मारक बनणार आहे.
सोमवारी रात्री नऊच्या सुमारास आधी पोलिसांनी पेट्रोल वेसलने त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश न आल्याने नौदलाची मदत घेण्यात आली.
यानंतर 'सीकिंग सी' या हेलिकॉप्टरच्या मदतीने बोटीवर अडकलेल्या चौघांनाही 15 मिनिटांत सुरक्षित बाहेर काढलं. त्यामुळे वेळीच मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळला. तपासणीनंतर त्यांना पाठवण्यात आलं.
समुद्रात सोनिका नावाच्या टग बोटीवर चार क्रू मेंबर अडकले होते. ओहोटी दरम्यान दगडात ही बोट अडकली आणि त्यात पाणी भरण्यास सुरुवात झाली. ज्या ठिकाणी ही बोट अडकली तिथे शिवस्मारक बनणार आहे.
सोमवारी रात्री नऊच्या सुमारास आधी पोलिसांनी पेट्रोल वेसलने त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश न आल्याने नौदलाची मदत घेण्यात आली.
यानंतर 'सीकिंग सी' या हेलिकॉप्टरच्या मदतीने बोटीवर अडकलेल्या चौघांनाही 15 मिनिटांत सुरक्षित बाहेर काढलं. त्यामुळे वेळीच मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळला. तपासणीनंतर त्यांना पाठवण्यात आलं. आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग