एक्स्प्लोर

Anil Parab यांच्या सीएच्या निवासस्थानी आयकर विभागाचे छापे

आयकर विभागाने आज (8 मार्च) सकाळीच अनिल परब यांचे निकटवर्तीय संजय कदम तर आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या निवासस्थानी छापे टाकले.

मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या सीएच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले आहे. मुंबई वांद्रे एमआयजी परिसरातील एलिट इमारतीत ही छापेमारी सुरु आहे. आयकर विभागाने सकाळीच अनिल परब यांचे निकटवर्तीय संजय कदम तर आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या निवासस्थानी छापे टाकले. महत्त्वाचं म्हणजे आज दुपारी चार वाजता शिवसेना खासदार संजय राऊत पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यापूर्वीच आयकर विभागाचं धाडसत्र सुरु झाल्याने त्याचीच चर्चा रंगली आहे.

आयकर विभागाची टीम घटनास्थळी उपस्थित असून सीआयएसएफचे जवानांना एमआयजी परिसरात तैनात करण्यात आले आहेत. एआयजी क्लबच्या बाजूला अनिल परब यांचं वास्तव्य आहे. शेजारीच त्यांचे सीए राहतात. दरम्यान अनिल परब यांच्या कार्यालयातही आयकर विभागाची टीम जाऊ शकते असं सांगितलं जात आहे.

राहुल कनाल यांच्या घरावर आयकर विभागाची धाड, आदित्य ठाकरे म्हणाले...

संजय कदम यांच्या घरी आयकर विभागाचा छापा
परिवहन मंत्री अनिल परबांचे निकटवर्तीय समजले जाणारे संजय कदम यांच्या घरी आयकर विभागाचे अधिकारी धडकले. संजय मानजी कदम हे शिवसेनेच्या अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे संघटक आहेत. त्यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. 

राहुल कनाल यांच्याही निवासस्थानी छापा
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय तसेच शिर्डी संस्थानाचे विश्वस्त राहुल कनाल हे सध्या आयकर विभागाच्या रडारवर आहेत. त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी छापेमारी सुरु आहे. आज आयकर विभागानं मुंबईत आणि पुण्यात छापेमारी सुरु केली आहे. आयकर विभागाचं एक पथक कनाल यांच्या वांद्रे येथील नाईन अल्मेडा इमारतीतील घरी आलं आणि त्यांनी झाडाझडती सुरू केली. यावेळी कनाल यांच्या इमारतीखाली सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांचा बंदोबस्त ठेवला आहे.

Sanjay Raut यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी शिवसेना नेत्यांवर आयटीचे छापे, अनेकांना 15 फेब्रुवारीची आठवण!

काही दिवसांपूर्वी शिवसेना उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरावर आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. जवळपास चार दिवस हे धाडसत्र सुरु होतं. अशातच आता शिवसेनेशी संबंधित तिघांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. 

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी धाडसत्र
आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांच्या निकटवर्तीयांवरील आयकर विभागाच्या कारवाईमुळे अनेकांना संजय राऊत यांनी याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेची आठवण झाली. कारण 15 फेब्रुवारी 2022 रोजी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेणार असल्याचं आधीच जाहीर केलं होतं. त्यादिवशी सकाळीच ईडीने मुंबईत छापेमारी केली. दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तीवर ईडीने कारवाई केली. या कारवाईनंतर केलेल्या तपासाअंती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जमीन खरेदीचं प्रकरण समोर आलं आणि त्यांना ईडीने अटक केली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahayuti Government : महायुती सरकारची उद्या संयुक्त पत्रकार परिषद; मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्री काय बोलणार?
महायुती सरकारची उद्या संयुक्त पत्रकार परिषद; मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्री काय बोलणार?
योजना राबवा, पैसे द्या, पण राजकीय स्टंट करू नका; लाडक्या बहिणीच्या मृत्यूवरून छत्रपती संभाजीराजे कडाडले
योजना राबवा, पैसे द्या, पण राजकीय स्टंट करू नका; लाडक्या बहिणीच्या मृत्यूवरून छत्रपती संभाजीराजे कडाडले
कोरोना लसीच्या दुष्परिणामांचा आरोप करणारी याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारले
कोरोना लसीच्या दुष्परिणामांचा आरोप करणारी याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारले
MSRTC Ticket Hike Cancelled : मोठी बातमी, दिवाळीतील हंगामी भाडेवाढ रद्द, एसटी महामंडळाचा मोठा निर्णय,  प्रवाशांना दिलासा
प्रवाशांची दिवाळी गोड होणार, एसटीची हंगामी भाडेवाढ रद्द, महामंडळानं घेतला मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 14 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सUddhav Thackeray angiography : उद्धव ठाकरेंच्या धमन्यांध्ये आढळले ब्लाॅकेजTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2:30 PM : 14 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaNana Patole New Delhi :भाजपने कितीही वाईट रणनिती केली तरी महाराष्ट्रात मविआ सरकार येईल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahayuti Government : महायुती सरकारची उद्या संयुक्त पत्रकार परिषद; मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्री काय बोलणार?
महायुती सरकारची उद्या संयुक्त पत्रकार परिषद; मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्री काय बोलणार?
योजना राबवा, पैसे द्या, पण राजकीय स्टंट करू नका; लाडक्या बहिणीच्या मृत्यूवरून छत्रपती संभाजीराजे कडाडले
योजना राबवा, पैसे द्या, पण राजकीय स्टंट करू नका; लाडक्या बहिणीच्या मृत्यूवरून छत्रपती संभाजीराजे कडाडले
कोरोना लसीच्या दुष्परिणामांचा आरोप करणारी याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारले
कोरोना लसीच्या दुष्परिणामांचा आरोप करणारी याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारले
MSRTC Ticket Hike Cancelled : मोठी बातमी, दिवाळीतील हंगामी भाडेवाढ रद्द, एसटी महामंडळाचा मोठा निर्णय,  प्रवाशांना दिलासा
प्रवाशांची दिवाळी गोड होणार, एसटीची हंगामी भाडेवाढ रद्द, महामंडळानं घेतला मोठा निर्णय
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे रिलायन्स हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी दाखल, अँजिओप्लास्टी झाल्याची सूत्रांची माहिती
उद्धव ठाकरे रिलायन्स हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी दाखल, अँजिओप्लास्टी झाल्याची सूत्रांची माहिती
Maharashtra Assembly Election 2024 : परभणीत विधानसभेच्या तोंडावर महायुतीत जोरदार घमासान; भाजप पदाधिकाऱ्यांचा गंभीर इशारा, म्हणाले...
परभणीत विधानसभेच्या तोंडावर महायुतीत जोरदार घमासान; भाजप पदाधिकाऱ्यांचा गंभीर इशारा, म्हणाले...
फलटण-कोरेगावमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर शरद पवारांच्या उपस्थितीत तुतारी फुंकणार; अजित पवारांना धक्के सुरुच
फलटण-कोरेगावमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर शरद पवारांच्या उपस्थितीत तुतारी फुंकणार; अजित पवारांना धक्के सुरुच
Ladki Bahin Yojna: छातीत कळ आली अन् खाली कोसळल्या,  मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात 'लाडक्या बहिणीचा' मृत्यू
Ladki Bahin Yojna: छातीत कळ आली अन् खाली कोसळल्या, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात 'लाडक्या बहिणीचा' मृत्यू
Embed widget