एक्स्प्लोर

18 गावांचा पुन्हा कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत समावेश करा : हायकोर्ट

27 गावातील वगळेली 18 गावं केडीएमसीमध्येच राहणार, राज्य सरकारला दणकाराज्य सरकारची जून 2020 मधली अधिसूचना हायकोर्टाकडून रद्द.

मुंबई : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 18 गावं वगळून त्यांची स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केला आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी शासनाने कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाशी सल्ला मसलत करणं गरजेचं होतं असं स्पष्ट करत मुख्य न्यायमूर्तीं दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांनी हा सरकारी अध्यादेश फेटाळून लावला. त्यामुळे या 18 गावांचा आता पुन्हा केडीएमसीत शासनाला समावेश करावा लागणार आहे.

केडीएमसीच्या हद्दीतील 27 गावांपैकी 18 गावांसाठी कल्याण उपनगरीय नगरपरिषद स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आला होता. नगरविकास विभागाने 24 जून 2020 रोजी तशी अधिसूचना प्रसिद्ध केली होती. या अधिसूचनेला अनेक याचिकांमार्फत हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. त्यापैकी शेतकरी संतोष डावखर यांनी अ‍ॅड. राजेश दातार यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठसमोर सुनावणी घेण्यात आली. तेव्हा, सदर अधिसूचना बेकायदेशीर, अन्यायकारक, चुकीची आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा दावा अ‍ॅड. दातार यांच्यावतीने करण्यात आला.

Kanjurmarg Metro Car Shed | कांजूरमार्ग मेट्रोशेडचं काम तत्काळ थांबवा; हायकोर्टाचे निर्देश, राज्य सरकारला झटका

याचिकाकर्त्यांचा हा युक्तिवाद फेटाळून लावत सरकारी वकील भूपेश सामंत यांनी सांगितले की, राज्य सरकारला महापालिकेच्या हद्दीत बदल करण्याचे अधिकार असून शासन निर्णयाच्या गुणवत्तेवर याचिकेतून शंका उपस्थित करता येणार नाही. तसेच पालिका प्रशासनाने गेल्या पाच वर्षात कोणतीही हरकत घेतलेली नाही. पालिकेने याबाबत सरकारला पत्र देणं गरजेचं होतं. तसेच सभागृहात तसा ठराव संमत करणं गरजेचं होतं. तर हायकोर्टाने गेल्या सुनावणीवेळी कोणत्या कागदपत्रांच्या आधारे 18 गावे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या संदर्भातील मूळ दस्तऐवज न्यायालयात सादर करण्याचे आदेश सरकारला दिले होते. सर्व दस्तावेज पहिल्या नंतर हायकोर्टाने सरकारची मागणी फेटाळली. तसेच गावे वगळण्याचा निर्णय घेण्यापूर्वी शासनाने कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाशी चर्चा करणे गरजेचे होते असे निरीक्षण नोंदवत ही याचिका निकाली काढली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime : पुण्यात घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला बेड्या, चोरीच्या पैशातून घेतली होती कार, आठ गुन्हे उघडकीस
पुण्यात घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला बेड्या, चोरीच्या पैशातून घेतली होती कार, आठ गुन्हे उघडकीस
Donald Trump : युद्ध न थांबवल्यास गंभीर परिणाम भोगावे लागणार, पुतिन यांच्यासोबतच्या बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
युद्ध न थांबवल्यास गंभीर परिणाम भोगावे लागणार, पुतिन यांच्यासोबतच्या बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
Arjun Tendulkar : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचं लग्न ठरलं, मुंबईतील बड्या उद्योगपतीच्या घराण्याची लेक तेंडुलकरांची सून होणार
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचं लग्न ठरलं, मुंबईतील बड्या उद्योगपतीच्या घराण्याची लेक तेंडुलकरांची सून होणार
ICICI Bank : मोठी बातमी, आयसीआयसीआय बँकेचा मिनिमम बॅलन्सवरुन यूटर्न, काही तासांमध्येच निर्णय फिरवला, नवी अपडेट समोर
आयसीआयसीआय बँकेचा मिनिमम बॅलन्सवरुन यूटर्न, काही तासांमध्येच निर्णय फिरवला, नवी अपडेट समोर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Full PC : पवारसाहेब भाजपसह येणं मला तरी शक्य वाटत नाही - छगन भुजबळ
Koyta Gang | पुण्यात Koyta Gang ची दहशत, नागरिकांमध्ये संताप व्यक्त
Raksha Khadse : महाजन आणि खडसेंमधील वादासंदर्भात रक्षा खडसेंनी बोलणं टाळलं
Mahadevi Elephant | महादेवी Nandani Math मध्ये परतणार, Ambani परिवाराचे आभार, SC मध्ये याचिका
Maharashtra Rain | वाशिममध्ये जीवघेणा प्रवास, पूल पाण्याखाली, रस्ता बंद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime : पुण्यात घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला बेड्या, चोरीच्या पैशातून घेतली होती कार, आठ गुन्हे उघडकीस
पुण्यात घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला बेड्या, चोरीच्या पैशातून घेतली होती कार, आठ गुन्हे उघडकीस
Donald Trump : युद्ध न थांबवल्यास गंभीर परिणाम भोगावे लागणार, पुतिन यांच्यासोबतच्या बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
युद्ध न थांबवल्यास गंभीर परिणाम भोगावे लागणार, पुतिन यांच्यासोबतच्या बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
Arjun Tendulkar : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचं लग्न ठरलं, मुंबईतील बड्या उद्योगपतीच्या घराण्याची लेक तेंडुलकरांची सून होणार
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचं लग्न ठरलं, मुंबईतील बड्या उद्योगपतीच्या घराण्याची लेक तेंडुलकरांची सून होणार
ICICI Bank : मोठी बातमी, आयसीआयसीआय बँकेचा मिनिमम बॅलन्सवरुन यूटर्न, काही तासांमध्येच निर्णय फिरवला, नवी अपडेट समोर
आयसीआयसीआय बँकेचा मिनिमम बॅलन्सवरुन यूटर्न, काही तासांमध्येच निर्णय फिरवला, नवी अपडेट समोर
Navi Mumbai : धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना मोठा दिलासा, रखडलेले गृहप्रकल्प मार्गी लागणार; पर्यावरण विभागाकडून NOC घेण्यास कोर्टाची परवानगी
धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना मोठा दिलासा, रखडलेले गृहप्रकल्प मार्गी लागणार; पर्यावरण विभागाकडून NOC घेण्यास कोर्टाची परवानगी
Shashank Ketkar Shares Video Of Police Van: शासकीय गाड्यांना, पोलीस व्हॅनला चलान लागतं का? मराठमोळ्या अभिनेत्याचा प्रश्न, प्रशासनाकडून उत्तर मिळणार?
शासकीय गाड्यांना, पोलीस व्हॅनला चलान लागतं का? मराठमोळ्या अभिनेत्याचा प्रश्न, प्रशासनाकडून उत्तर मिळणार?
Suraj Chavan : कोपऱ्यापासून ढोपरापर्यंत मारणाऱ्या 'मारकुट्या' सूरज चव्हाणांचे महिन्याआधीच पुनर्वसन, NCP प्रदेश सरचिटणीस पदाची मोठी जबाबदारी
Suraj Chavan : कोपऱ्यापासून ढोपरापर्यंत मारणाऱ्या 'मारकुट्या' सूरज चव्हाणांचे महिन्याआधीच पुनर्वसन, NCP प्रदेश सरचिटणीस पदाची मोठी जबाबदारी
Ajit Doval : ट्रम्प टॅरिफ बॉम्बवर चीनच्या मैत्रीचा उतारा; चीनचे परराष्ट्रमंत्री अन् अजित डोवाल भेट फिक्स
ट्रम्प टॅरिफ बॉम्बवर चीनच्या मैत्रीचा उतारा; चीनचे परराष्ट्रमंत्री अन् अजित डोवाल भेट फिक्स
Embed widget