महाराष्ट्रात गुगल क्लासरुम प्रकल्पाचं उद्घाटन; देशातील पहिलं राज्य ठरल्याचा अभिमान : मुख्यमंत्री
शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन व गूगल यांच्यामार्फत राज्यातील शाळांसाठी गूगल क्लासरूम प्रकल्पाचे आज उद्घाटन करण्यात आले आहे. असा प्रकल्प राबवणारे महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य ठरल्याचा सार्थ अभिमान असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
![महाराष्ट्रात गुगल क्लासरुम प्रकल्पाचं उद्घाटन; देशातील पहिलं राज्य ठरल्याचा अभिमान : मुख्यमंत्री Inauguration of Google Classroom in Maharashtra; Proud to be the first state in the country says CM thackeray महाराष्ट्रात गुगल क्लासरुम प्रकल्पाचं उद्घाटन; देशातील पहिलं राज्य ठरल्याचा अभिमान : मुख्यमंत्री](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/08/07000553/oogle-classroom.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद आहेत. परिणामी विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी पालक चिंता व्यक्त करत आहे. या पार्श्वभूमीवर आज शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन व गूगल यांच्यामार्फत राज्यातील शाळांसाठी गूगल क्लासरूम प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. गुगल क्लासरुमच्या माध्यमातून असे पाऊल टाकणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले. त्यांनी शिक्षणमंत्री शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनासोबत गुगलने भागीदारी केली आहे. या उपक्रमाची अधिकृत घोषणा आज ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या भागीदारीमुळे राज्यातील 2.3 कोटी विद्यार्थी आणि शिक्षक एकत्रित शिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रवेश करू शकणार आहेत. जी स्वीट फॉर एज्युकेशन, गूगल क्लासरूम, गूगल मीट यासारख्या विनामूल्य साधनांसह दूरस्थ शिक्षणाची सोय यामुळे होणार आहे.वर्क फ्रॉम होमसाठी सहकार्य करावे : मुख्यमंत्री जे शिक्षक या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन उपक्रमात सहभागी झाले त्यांचेही मी अभिनंदन करतो असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, गुगलमुळे हे शक्य झाले आहे. भावीकाळात वर्क फ्रॉम होमची संकल्पना यशस्वीपणे राबविताना उपलब्ध तंत्रज्ञानाचा अधिकाधिक चांगला उपयोग कसा होऊ शकेल यासाठीही गुगलने सहकार्य करावे. मुख्यमंत्र्यांनी गुगल क्लासरुम आणि गुगल सुटच्या माध्यमातून शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या. ते म्हणाले की गुगलच्या सहकार्याने आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्यातील सर्व भागातील विद्यार्थ्यांची शिक्षण प्रक्रिया सुरुळित सुरु होण्यास यामुळे मदत होईल.
Mumbai Police | मुंबई पोलिसांबाबत अमृता फडणवीस यांना सुप्रिया सुळे यांचं अप्रत्यक्ष उत्तर
गुगल आणि शालेय शिक्षण विभागाच्या प्रयत्नांचे कौतुक : उपमुख्यमंत्री अजित पवार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह राज्यातील इतर विद्यार्थ्यांचे शिक्षण या कठीण काळात थांबू नये, आणि प्रत्येकाला पूर्वीप्रमाणेच शिक्षण मिळवता आले पाहिजे, यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांनी केलेल्या संयुक्त प्रयत्नांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुरु केलेला शिक्षणासाठी जी स्वीट आणि राज्य शाळांकरिता गुगल क्लास रुम कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. गुगल क्लासरुम मध्ये विद्यार्थी घरी बसून शिकू शकतात, ते प्रश्न विचारू शकतात आणि शंकाचे निरसन करू शकतात.
शिक्षणातील अग्रेसर राज्य बनविणार : शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण पोहचविण्यासाठी आणि शिक्षणातील दरी कमी करण्यासाठी इंटरनेटच्या सामर्थ्याचा वापर करुन, ऑनलाईन संसाधने, प्लॅटफॉर्म, बँडविड्थ आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन महाराष्ट्राला शिक्षणातील सर्वात प्रगतीशील राज्य बनविण्याचे आमचे लक्ष्य आहे, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
Pune Online Classes | फी न भरल्याने मुलांचं ऑनलाईन शिक्षण बंद, पुण्यातील रायन स्कूलमधील प्रकार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)