एक्स्प्लोर

Mumbai Police | मुंबई पोलिसांबाबत अमृता फडणवीस यांना सुप्रिया सुळे यांचं अप्रत्यक्ष उत्तर

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन सध्या मुंबई पोलिसांवर टीका होत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनीही दोन दिवसांपूर्वी शहरात मला सुरक्षित वाटत नसल्याची भावना व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेले ट्विट अमृता फडणवीस यांना अप्रत्यक्ष टोला असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई : कोणत्याही संकटात मुंबई पोलीस नेहमीच तत्पर असतात. मग तो दहशतवादी हल्ला असो, आंदोलन असो की पाऊस. मुंबई पोलीस नेहमीचं नागरिकांच्या रक्षणाकरता आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत असतात. याच मुंबई पोलिसांवरुन काही दिवसांपासून राजकारण सुरू आहे. सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांवर अनेक आरोप करण्यता आले. यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचाही समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत अमृता फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. मुंबईत कालपासून पावसामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्याची काल वाय.बी. चव्हाण इथे बैठक होती. बैठक झाल्यावर घरी परतताना स्वतः शरद पवार यांनी देखील आयुष्यात पहिल्यांदा असं चित्र पाहिल्याची प्रतिक्रिया दिली होती. तर सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत मुंबई पोलिसांचं कौतुक केलं. "आपली मुंबई सुरक्षित आहे ही मुंबई पोलीस तुम्ही बजावत असलेल्या कर्तव्यामुळेच… तुमच्या या मानवी मूल्ये जपणाऱ्या सेवाभावास सॅल्यूट.." असं ट्विट सुळे यांनी केलंय. अमृता फडणवीस यांना अप्रत्यक्ष टोला सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिसांचे विशेष कौतुक केले. पण अवघ्या दोन दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मात्र मुंबई पोलिसांवर आक्षेप घेतला होता. फिल्म्स स्टार सुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी या शहरात मला सुरक्षित वाटत नाही, या शहरात माणुसकी राहिलेली नाही, अशी भावना व्यक्त केली होती.आणि आज सुप्रिया सुळे यांनी ट्विट मधून अप्रत्यक्षरीत्या अमृता फडणवीस यांना उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले आहे. राज्यात सध्या सुशांत सिंग आत्महत्येप्रकरणी राजकारण तापलं आहे. भाजप एकीकडे सीबीआय तपासाची मागणी करत असताना महाविकास आघाडी मात्र मुंबई पोलिसांच्या मागे ठाम उभी आहे. अशा वेळी ट्विटरवरुन भाजप विरुद्ध शिवसेना सामना रंगला असताना राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पोलिसांचे कौतुक करून शिवसेनेला पाठिंबा दिल्याचं चित्र आहे. Mumbai Tree Collapsed | मुसळधार पावसामुळे मुंबई हायकोर्ट परिसरातील झाडं उन्मळून पडली

महत्त्वाच्या बातम्या

 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
Mumbai KEM Hospital : तुकाराम मुंढेंनी वात पेटवली, आता आरोग्य समितीच्या अध्यक्षांची केईएम रुग्णालयात अचानक धाड, मध्यरात्री नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंनी वात पेटवली, आता आरोग्य समितीच्या अध्यक्षांची केईएम रुग्णालयात अचानक धाड, मध्यरात्री नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला भरपावसात पकडलं; वन विभागाच्या टीमचं धाडस, लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला भरपावसात पकडलं; वन विभागाच्या टीमचं धाडस, लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
Kolhapur Crime: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
Embed widget