एक्स्प्लोर

प्लास्टिक बंदी योग्यच, सरकारकडून हायकोर्टात निर्णयाचं समर्थन

प्लास्टिकचं पूर्णपणे विघटन होण्यास अनेक दशकांचा कालावधी लागतो. त्यामुळे भविष्याचा विचार करूनच सरकारने हा निर्णय घेतला, असं राज्य सरकारने हायकोर्टात सांगितलं.

मुंबई : पर्यावरणाच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने घेतलेला प्लास्टिक बंदीचा निर्णय हा योग्यच असल्याचं म्हणत राज्य सरकारने हायकोर्टात आपल्या निर्णयाचं समर्थन केलं. मुंबईसह राज्यभरात मिळून दिवसाला 1200 मेट्रिक टन प्लास्टिकचा घनकचरा निर्माण होतो. प्लास्टिकचं पूर्णपणे विघटन होण्यास अनेक दशकांचा कालावधी लागतो. त्यामुळे भविष्याचा विचार करूनच सरकारने हा निर्णय घेतला, असं राज्य सरकारने हायकोर्टात सांगितलं. प्लास्टिकचा महाराष्ट्राच्या सागरी जैवविविधतेवरही फार मोठा परिणाम होतोय हे हायकोर्टाला पटवून देताना साल 2017 च्या मान्सूनमध्ये मोठ्या भरतीच्यावेळी मरिन लाईन्सची झालेली दुरावस्था तसेच मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर मरून पडलेल्या देवमाशाचं उदाहरण देण्यात आलं. या देवमाशाच्या शवविच्छेदन अहवाला दरम्यान त्याच्या पोटात प्लास्टिकचा मोठा गोळा आढळून आल्याचं राज्य सरकारने हाकोर्टात सांगितलं. राज्यभरात जारी केलेल्या प्लास्टिक बंदी विरोधात प्लास्टिक उत्पादक संघटना आणि विक्रेत्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. राज्य सरकारने रातोरात हा निर्णय घेऊन राज्यातील सुमारे चार लाख लोकांचा रोजगार हिरावून घेतल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला. महाराष्ट्र प्लास्टिक उत्पादक संघटना, प्लास्टिक उत्पादक संघ तसेच अन्य काही प्लास्टिक वितरकांनी या याचिका दाखल केल्या आहेत. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर या याचिकांवर सुनावणी सुरु आहे. गुरूवारीही या याचिकेवर सुनावणी सुरू राहील, ज्यात राज्य सरकार आपली बाजू मांडणार आहे. या सुनावणीसाठी बुधवारी हायकोर्टात राज्यभरातील प्लास्टिक उत्पादक, वितरक या सर्वांनी मोठी गर्दी केली होती. हायकोर्टात जमलेली ही गर्दी पाहता पोलिसांची जादा कुमक मागवून न्यायमूर्ती अभय ओक यांच्या कोर्टाचं कामकाज दुपारनंतर पोलिसांच्या सुरक्षेत सुरू करावं लागलं. यावर हायकोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त करत याचिकाकर्त्यांच्या वकिलांना धारेवर धरलं. संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित असताना इतक्या मोठ्या संख्येने जमाव गोळा होण्याचं कारणच काय? असा सवाल करत जोपर्यंत ही गर्दी इथून हटत नाही तोपर्यंत या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला होता. गर्दी कमी झाल्यावर अखेरीस ही सुनावणी सुरू झाली. युक्तिवादाला सुरूवात होण्यापूर्वीच हायकोर्टाने स्पष्ट केलं की, प्लास्टिक बंदीला अनुसरून याचिकाकर्त्यांना काही आक्षेप असल्यास त्यांनी आधी राज्य सरकारकडे दाद मागावी. राज्य सरकारने या बंदीबाबत कायदा करताना तशी तरतूद ठेवलेली आहे. राज्य सरकारकडून समाधान न झाल्यास हायकोर्टात येण्याचा पर्याय उपलब्ध आहेच, असंही हायकोर्टानं स्पष्ट केलं. दरम्यान, राज्य सरकार दाद देत नसल्याने हायकोर्टाचं दार ठोठावल्याचं याचिकाकर्त्यांनी हायकोर्टाला सांगितलं. ही प्लास्टिक बंदी बेकायदेशीर असल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. बंदी करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, तो अधिकार केंद्राचा असतानाही राज्य सरकारने अचानकपणे प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला असल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. त्याचप्रमाणे सूचना आणि हरकती न मागवताच निर्णय घेतला गेल्याने जनसामान्यांवर याचा मोठा परिणाम होणार असल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Samadhan Sarvankar On Shivsena UBT Vishakha Raut: व्यवसाय मजूर-घरकाम...बाप रे?; विशाखा राऊतांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर समाधान सरवणकरांचा आणखी एक आरोप
व्यवसाय मजूर-घरकाम...बाप रे?; विशाखा राऊतांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर समाधान सरवणकरांचा आणखी एक आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
BMC Fellowship Programme: 61 हजार 500 रुपये मानधनासाठी तरुणाईची गर्दी; 50 जागांसाठी अडीच हजार तरुणांची रुची, BMC फेलोशिपला डॉक्टर, इंजिनिअरसह उच्चशिक्षितांचाही प्रतिसाद
61 हजार 500 रुपये मानधनासाठी तरुणाईची गर्दी; अवघ्या 50 जागांसाठी अडीच हजार तरुणांची रुची, महापालिका फेलोशिपला डॉक्टर, इंजिनिअरसह उच्चशिक्षितांचाही प्रतिसाद
Share Market News : शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Embed widget