एक्स्प्लोर
Advertisement
खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा ताब्यात घेण्याच्या सरकारच्या धोरणावर 'आयएमए'कडून प्रश्नचिन्ह
खाजगी रुग्णालयातील खाटा ताब्यात घेण्याबाबत सरकारचं धोरण संदीग्ध असून यामध्ये काही गोष्टी स्पष्ट होणे गरजेचं आहे. सध्या खाजगी डॉक्टरांमध्ये भीतीचं वातावरण आहे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश भोंडवे यांनी म्हटलं.
मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांची मुंबईतील आणि राज्यातील वाढती संख्या लक्षात घेत खाजगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा ताब्यात घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. या आदेशानुसार राज्यातील सर्वच खासगी रुग्णालयांना नोटीसा धाडल्या जात आहेत. या धोरणाबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनकडून काही प्रश्न उपस्थित केले गेले आहे. खाजगी रुग्णालयातील खाटा ताब्यात घेण्याबाबत सरकारचं धोरण संदीग्ध असून यामध्ये काही गोष्टी स्पष्ट होणे गरजेचं आहे. यामुळे सध्या खाजगी डॉक्टरांमध्ये भीतीचं वातावरण आहे, असं इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश भोंडवे यांनी म्हटलं.
इंडियन मेडिकल असोसिएशनने उपस्थित केलेले प्रश्न
- - खासगी रुग्णालयाची खाटांची संख्या 2 ते 1500 पर्यंत आहे. त्यामुळे या सर्वंच रुग्णालयांतील 80 खाटा ताब्यात घेतल्या जाणार आहेत का? की काही ठराविक संख्या असलेल्या खासगी रुग्णालयांतील खाटाच ताब्यात घेतल्या जाणार आहेत. याबद्दल स्पष्टीकरण नाही.
- केंद्रीय आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कोविड हॉस्पिटलमध्ये आवश्यक असलेल्या सुविधा असलेल्या रुग्णालयांतील खाटाच ताब्यात घेतल्या जाणार आहेत, की राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे सरसकट सर्वच खासगी रुग्णालयांतील खाटा अधिग्रहीत गेल्या जाणार आहेत.
- जी हॉस्पिटल्स या आदेशानुसार अधिग्रहित होणार आहे, त्यांच्याशी काही कायदेशीर करार केला जाणार आहे का?
- महाराष्ट्रातील अनेक हॉस्पिटल कमी खाटांची आहे. कमी डॉक्टरांनी मिळून सुरु केलेली ही हॉस्पिटल्स आहेत. काही डॉक्टरांनी आपल्या स्पेशॅलिटीप्रमाणे हॉस्पिटल्स बनवलेली असतात, त्या सर्वच ठिकाणी कोविड रुग्णांवर उपचार कसे होणार?
- जर खासगी हॉस्पिटल्समध्ये कोविडचे रुग्ण असल्याचं समजल्यास, इतर रुग्ण अशा हॉस्पिटल्समध्ये येणे टाळतील.
- सर्वच हॉस्पिटलमधील 80 खाटा राखीव ठेवण्यात आल्या तर इतर रुग्णांनी कुठे उपचार घ्यायचे?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
ठाणे
विश्व
Advertisement