एक्स्प्लोर
लोकलमध्ये लवकरच नवी तिकीट प्रणाली, लाईन बदलल्यास भुर्दंड
मुंबई : मुंबईत लोकलच्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवर झोन आधारित तिकीट प्रणाली राबवण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे लांब पल्ल्याचा उपनगरी प्रवास करणाऱ्यांचे तिकीटदर कमी होण्याची शक्यता आहे. मात्र मध्यवरुन पश्चिम किंवा हार्बर मार्गावर प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागू शकते.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाने लोकलसाठी प्रस्ताव तयार केला आहे. या प्रणालीमध्ये मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गाचे चार विभाग तयार करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे दिला जाणार आहे. तो लागू झाल्यास तिकीटांपासून मिळणारं रेल्वेचं वार्षिक उत्पन्न 1556 कोटी रुपयांवरुन 2468 कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल, असा दावा एमआरव्हीसीने केला आहे.
10.9 लाख प्रवाशांना फायदा
मुंबईत सुमारे 30 लाख प्रवासी लोकलचा पास वापरतात. यापैकी 10.9 लाख प्रवाशांना (37.5%) या नव्या प्रणालीचा फायदा होईल. नव्या तिकीट प्रणालीमुळे झोनमधील अंतरादरम्यान प्रवासी भाड्यात काहीही बदल होणार नाही. उदा. चर्चगेट-दादर (10.17 किमी) हा एक झोन असेल. या झोनमध्ये दोन फर्स्ट क्लास भाड्याचे स्लॅब आहेत. चर्चगेट-मुंबई सेंट्रल 50 रुपये आणि चर्चगेट-दादर 70 रुपये असे दर आहेत. मात्र प्रस्तावानुसार, चर्चगेट ते दादर प्रवासासाठी 25 रुपये आकारले जातील.
मध्य रेल्वेवरुन ते पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास केल्यास तिकीट दरात 5 रुपये (सेकंड क्लास) ते 25 रुपयांची (फर्स्ट क्लास) अतिरिक्त वाढ करण्याचा प्रस्ताव एमआरव्हीसीने ठेवला आहे.
रेल्वेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी प्रस्ताव
भारतीय रेल्वेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी नोव्हेंबर 2016 मध्ये रेल विकास शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. पंतप्रधानांनी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून कल्पना मागवल्या होत्या. त्यामधून झोन आधारित प्रणालीच्या प्रस्तावाची निवड करण्यात आली.
"नव्या प्रणालीनुसार, मर्यादित अंतरामध्ये प्रवास करणाऱ्यांचे तिकीट दर हे जास्त अंतरात प्रवास करणाऱ्यांच्या तुलनेत कमी आहे. पास असणाऱ्या 30 लाख प्रवाशांपैकी 9.2 लाख प्रवासांवर या प्रणालीचा फारसा परिणाम होणार नाही," असं एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय म्हणाले.
कसे असतील नवे दर?
या प्रणालीनुसार, सीएसटी-दादर आणि चर्चगेट-दादर या मार्गावरील मासिक पाससाठी 450 रुपयांऐवजी 485 रुपये द्यावे लागतील. तर चर्चगेट-दादर या एका झोनमधील सेकंड क्लासच्या प्रवासांना मासिक पाससाठी 150 रुपये मोजावे लागतील. सध्या चर्चगेट-दादर मासिक पास 130 रुपयांना मिळतो, असंही प्रभात सहाय यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement