एक्स्प्लोर
Advertisement
18व्या वर्षी निवडणूक लढवण्याचा अधिकार का नाही? : आदित्य ठाकरे
'मतदान जर 18व्या वर्षी करता येतं तर 18 किंवा 21व्या वर्षी निवडणूक का लढवता येत नाही?'
मुंबई : 'मतदान जर 18व्या वर्षी करता येतं तर 18 किंवा 21व्या वर्षी निवडणूक का लढवता येत नाही?' असा सवाल युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी किमान 25 वर्ष वय असणं गरजेचं आहे. पण याच मुद्द्यावर आदित्य ठाकरेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.
आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?
'जर 18 व्या वर्षी मतदान करता येतं तर 18 किंवा 21व्या वर्षी निवडणूक का लढवता येत नाही? काही देशांमध्ये तर वयाच्या 18 व्या वर्षीच निवडणूक लढवता येते. राजकारणातील चांगल्या बदलासाठी आमची तरुणाई जबाबदार आहे. त्यामुळे या गोष्टीवर विचार व्हायला हवा. यासंबंधी 2013 साली मी एका बैठकीत माझं मतंही मांडलं होतं.' असं ट्वीट आदित्य ठाकरेंनी केलं आहे.
जास्तीत जास्त तरुण राजकारणात सक्रिय झाले तर त्यांचा देशातील राजकारणाला नक्कीच फायदा होऊ शकतो. असं मतही आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं आहे.आदित्य ठाकरे सध्या युवा सेनेच्या अध्यक्षपदी असून ते वारंवार तरुणाईचे प्रश्न मांडताना दिसून येतात. संबंधित बातम्या : पंतप्रधान मोदींकडून आदित्य ठाकरेंचं जाहीर कौतुक नशीब, डोकलाम विषय संपला, नाहीतर मुंबई विद्यापीठ तेही कारण देईल : आदित्य ठाकरे फुटबॉलप्रेमानं ठाकरे बंधूंची नेक्स्ट जनरेशन एकत्र, आदित्य-अमित ठाकरेंची भेट फडणवीस सरकारची डेडलाईन शिवसैनिक ठरवतील : आदित्य ठाकरेJust a thought. I’ve voiced this in 2013 at a conclave. If one can vote at 18, why can’t one contest elections at 18 or 21? In some countries, one can contest elections at the age of 18. Our youth is responsible and energetic enough to be the change and do good things
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 23, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement