एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

सेल्फी नव्हे, शुद्ध हवेसाठी जहाजाच्या काठावर बसले होते : अमृता फडणवीस

"झालेल्या घटनेने कुणाचं नुकसान होत असले, तर आपण माफी मागायला तयार"

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सेल्फीच्या वादावर स्पष्टीकरण दिलंय. आपण क्रुझच्या टोकावर फक्त शुद्ध हवा घेण्यासाठी गेल्याचं त्यांनी म्हटलंय. झालेल्या घटनेने कुणाचं नुकसान होत असले, तर आपण माफी मागायला तयार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. मुंबई-गोवा क्रुझवरचा अमृता फडणवीस यांचा सेल्फी वायरल झाल्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा सेल्फीवाद सेल्फी काढण्याच्या हौसेपोटी स्वतःचा जीव धोक्यात घालू नका, असं आवाहन वारंवार पोलिस प्रशासन, राज्य सरकार यांच्याकडून केलं जातं. मात्र खुद्द मिसेस मुख्यमंत्र्यांनाच या गोष्टीचा विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सेल्फी काढत असतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे. क्रुझच्या टोकाला असलेल्या धोकादायक ठिकाणी बसून मिसेस फडणवीस सेल्फी काढताना दिसत आहेत. मुंबई-गोवा क्रुझचा उद्घाटन सोहळा काल पार पडला. या कार्यक्रमादरम्यान क्रुझच्या अगदी टोकाला जाऊन सेल्फी घेण्याचा मोह अमृता फडणवीसांना आवरला नाही. त्या एकट्याच क्रुझच्या टोकाला जाऊन सेल्फी घेत होत्या. सर्वात पुढच्या डेकवर सुरक्षा रेलिंग ओलांडून अमृता फडणवीसांनी सेल्फी काढले. त्या जिथे बसल्या होत्या, तिथे जाण्यास बंदी आहे. अमृता फडणवीसांचा सेल्फी काढून होईपर्यंत बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांच्याही जीवात जीव नव्हता. पोलिस अधिकारी रश्मी करंदीकर आणि बॉडीगार्डनी त्यांना या परिस्थितीची जाणीवही करुन दिली, तरी त्या जागेवरुन हटल्या नाहीत. अखेर, त्या धोकादायक टोकावरुन मिसेस मुख्यमंत्री निघाल्यानंतर पोलिसांचा जीव भांड्यात पडला. मिसेस मुख्यमंत्री सेल्फी घेत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर काही क्षणांतच वायरल झाला. त्यानंतर नेटिझन्सनी अमृता फडणवीसांना यथेच्छ ट्रोल केलं. सुरक्षेची काळजी न घेता सेल्फी काढल्याबद्दल अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. आंग्रिया क्रूझ मुंबईतील भाऊचा धक्का येथून आंग्रिया ही क्रुझ गोव्याच्या दिशेने रवाना झाली. या क्रुझला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झेंडा दाखवला. क्रुझवर पर्यटकांसाठी शाही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मराठा आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या नावावरुनच या क्रुझचं नाव आंग्रिया असं ठेवण्यात आलं आहे. व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Embed widget