एक्स्प्लोर

मोठी बातमी! बायकोनं विकत घेतलेल्या घरावर नवऱ्याचा अधिकार नाही; कुटुंब न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, घटस्फोटानंतर त्या घरात जाण्यासही कोर्टाची मनाई

Mumbai News : बायकोनं विकत घेतलेल्या घरावर नवऱ्याचा अधिकार नाही; कुटुंब न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, घटस्फोटानंतर त्या घरात जाण्यासही कोर्टाची मनाई

Maharashtra News : मुंबई : पत्नीनं (Wife) तिच्या पैशानं घेतलेल्या घरावर पतीचा अधिकार राहत नाही. ती त्या घराची एकटीच मालकीण आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा कुटुंब न्यायालयानं (Family Court) दिला आहे. याप्रकरणात पती-पत्नीचा घटस्फोट (Divorce of Husband And Wife) झालेला आहे, त्यामुळे पतीनं (Husband) आता त्या घरातही जाऊ नये, असंही कोर्टानं आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे. इतकंच नव्हे तर सहमालक म्हणून पतीचं नाव त्या घराच्या नोंदणीतून काढून टाकावं, असे निर्देश देत न्यायालयानं पत्नीला दिलासा आहे. 

महत्त्वाची बाब म्हणजे, या जोडप्याचं एक घर करीरोड इथंही घर आहे. या घराचेही पैसे मीच दिले आहेत. त्यामुळे या घरावरही माझा दावा आहे, असं पत्नीचं म्हणणं होतं. मात्र, या घराचे पैसे दिल्याचे पुरावे पत्नी कोर्टात सादर करु शकली नाही. तसेच, घराचे पूर्ण पैसे पतीनंच दिले हेही सिद्ध होऊ शकलं नाही. मात्र, हे घर पतीच्या नावानं खरेदी करण्यात आलं होतं. त्यामुळे त्याची मालकी पतीकडेच राहील, असं न्यायालयानं आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे.

प्रकरण नेमकं काय? 

या जोडप्याचा विवाह साल 2001 मध्ये झाला होता, त्यांना दोन मुली आहेत. गोरेगाव येथील घर दोघांनी गृहकर्ज काढून घेतलेलं आहे. मात्र त्या घराचे पूर्ण पैसे मीच भरले आहेत, असा पत्नीचा दावा होता. पती आणि सासरचे त्रास देत असल्याने पत्नीने अॅड. परेश देसाई यांच्यामार्फत घटस्फोटासाठी अर्ज केला होता. या अर्जात पत्नीने करीरोड व गोरेगाव येथील घरावर दावा सांगितला होता.

गोरेगाव येथील घरासाठी आगाऊ रक्कम आपण दिली होती. या घरासाठी कर्जही काढले होते. त्या कर्जाचे हफ्ते आपण भरले आहेत. त्याची सर्व कागदपत्रे सादर झाली आहेत, असा दावा पत्नीने केला होता. तर गोरेगाव येथील घराचा मी सहमालक आहे. तशी नोंद सर्व कागदपत्रांवर आहे, असा युक्तिवाद पतीने केला होता. गोरेगाव येथील घराचा सहमालक पती असला तरी हे घर पत्नीनं खरेदी केलेलं आहे. त्याची सर्व कागदपत्रे सादर झालेली आहेत. पतीनं या घरासाठी पैसे दिल्याचा काहीच पुरावा नाही. पत्नीनेकडेच या घराची मालकी असायला हवी, असं निरीक्षण नोंदवत कोर्टानं पत्नीची याचिका मान्य केली.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Marathi Sign board: दुकानांवर मराठी फलक न लावणाऱ्यांना आता अद्दल घडणार, पालिकेचा मोठा निर्णय, दुप्पट मालमत्ता कर भरावा लागणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 07 PM: 12 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सJob Majha : रेल्वे सुरक्षा दलात RPF सब इंस्पेक्टर पदासाठी 452 जागांवर भरती : जॉब माझा ABP MajhaMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 12 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना
Embed widget