अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
सीएमएचओ डॉ. दिनेश खत्री यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, डॉ. जयप्रकाश किरार यांच्या कारला अज्ञात डंपरने धडक दिली.
रायसेन : मध्य प्रदेशच्या रायसेन जिल्ह्यातील भाजपचे (BJP) माजी जिल्हाध्यक्ष आणि मध्य प्रदेश राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. जयप्रकाश किरार यांचे अपघाती निधन झाले. शनिवारी रात्री उशिरा जयप्रकाश हे उज्जैनवरुन परत येत असताना रायसेन जिल्ह्याच्या खानपुरा गावाजवळ त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. डंपर आणि त्यांच्या कारची धडक बसल्याने झालेल्या अपघातात (Accident) त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, भाजप प्रदेशाध्यक्ष वीडी शर्मा यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी सोशल मीडियातून (Social media) शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
सीएमएचओ डॉ. दिनेश खत्री यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, डॉ. जयप्रकाश किरार यांच्या कारला अज्ञात डंपरने धडक दिली. या दुर्घनटेत गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. येथील रायसेन जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचे पार्थिव कुटुंबीयांकडे देण्यात आले. या दुर्घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले होते.
दरम्यान, या दुर्घटनेत जयप्रकाश यांच्या कारला धडक देऊन डंपरचालक फरार झाला आहे. डंपरसह चालक फरार असून पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. अद्यापही डंपरचा शोध लावण्यास पोलिसांनी अपयश आलं आहे. रायसेनचे एसपी विकास कुमार अग्रवाल यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून कसून तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
भारतीय जनता पार्टी रायसेन के पूर्व जिला अध्यक्ष व मेरे परम मित्र डॉ. जय प्रकाश किरार जी के असामयिक निधन का समाचार सुनकर दु:खी एवं स्तब्ध हूं।
— Shivraj Singh Chouhan (मोदी का परिवार ) (@ChouhanShivraj) May 12, 2024
मेरी संवेदनाएं शोकाकुल परिवारजनों के साथ हैं।
ईश्वर से दिवंगत पुण्य आत्मा को अपने श्री चरणों में स्थान देने एवं शोकाकुल परिवार को गहन… pic.twitter.com/jDPehS2uTY
भाजपचे रायसेन माजी जिल्हाध्यक्ष जयप्रकाश किरार यांच्या निधनाचे दु:ख वेदनादायक आहे. ते माझे परमित्र होते, त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या सहवेदना व्यक्त करतो,असे ट्विट शिवराजसिंह चौहान यांनी केले आहे.
हेही वाचा