एक्स्प्लोर
तिहेरी तलाक प्रकरणी पतीला अटकपूर्व जामीन मंजूर
वसई येथे राहणाऱ्या मुन्शी यांचा 1998 साली निकाह झाला असून त्याला आणि त्याच्या पत्नीला तीन अपत्ये आहेत. या वर्षी मे महिन्यात मुन्शीनं त्याच्या पत्नीला माहेरी पाठवलं आणि जुलैमध्ये घटस्फोटाचा अर्ज सादर केला. हा खटला सुरु असतानाच 22 सप्टेंबरला तिहेरी तलाक झाला असल्याची नोटीस सदर महिलेला मिळाली.

मुंबई : तिहेरी तलाकची नोटीस धाडून आपल्या पत्नीशी काडीमोड घेणाऱ्या पतीला मुंबई उच्च न्यायालयानं अखेर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठानं 15 हजारांचा जामीन मंजूर करत याचिकाकर्त्याला दिलासा दिला आहे. वसई पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. इन्तेखाब आलम मुन्शी असे या पतीचे नाव असून आपल्याला अटक होऊ नये, यासाठी त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
वसई येथे राहणाऱ्या मुन्शी यांचा 1998 साली निकाह झाला असून त्याला आणि त्याच्या पत्नीला तीन अपत्ये आहेत. या वर्षी मे महिन्यात मुन्शीनं त्याच्या पत्नीला माहेरी पाठवलं आणि जुलैमध्ये घटस्फोटाचा अर्ज सादर केला. हा खटला सुरु असतानाच 22 सप्टेंबरला तिहेरी तलाक झाला असल्याची नोटीस सदर महिलेला मिळाली.
त्यानंतर या महिलेनं 23 ऑक्टोबरला पोलिसांत तक्रार दिली. त्यामुळे पोलिसांकडून आपल्याला केव्हाही अटक होईल या भितीने आरोपी पती मुन्शी याने पालघरच्या सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु सत्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावल्यानंतर आरोपीनं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
मुन्शी याची बाजू मांडणारे वकिल अॅड विन्सेंट डिसिल्वा यांनी कोर्टाला सांगितले की जून आणि जुलै महिन्यात याचिकाकर्त्यांनी दोन वेळा पत्नीला नोटीस धाडली आहे. मात्र ती नोटीस न मिळाल्याचा कांगावा केला जात आहे. तिहेरी तलाकवर केंद्र सरकारने बंदी घातली असून हा गुन्हा आहे, असा युक्तीवाद पत्नीच्यावतीने हायकोर्टात करण्यात आला होता.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement